file photo 
मराठवाडा

हिंगोली : छंदी पत्रकाराला महिला रुग्नालयातील चित्रिकरण भोवले; डॉक्टरांच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा 

संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : येथील एका छंदी व हौसी मोबाईल पत्रकाराला महिला रुग्णालयातील प्रसुतीगृहातील चित्रीकरण करणे चांगलेच महागात पडले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांच्या तक्रारीवरुन वैद्यकीय सेवेत अडथळा आणला म्हणून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील दिनेश कुलकर्णी यांनी मागील तीन दिवसांपासून परवानगी न घेता महिला रुग्णालयात जाऊन रुग्णालयातील प्रसुतीगृहात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या महिला रुग्णांचे चित्रीकरण केले. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाने थैमान घातले असून रुग्ण संख्येतही वाढ होत आहे.

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

अशा परिस्थितीत योग्य ती खबरदारी व परवानगी न घेता सतत तीन दिवसापासून सदरील इसम त्रास देत असून वैद्यकीय सेवेत अडथळा आणत आहे. महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक पुरुषोत्तम भोरगे यांच्या तक्रारीवरुन आरोपी दिनेश कुलकर्णी याच्याविरुद्ध रविवार  (ता. २१) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री बोधनापोड पुढील तपास करीत आहेत.

सोशल मिडियावर बसेल अंकुश

स्मार्ट मोबाईलचा फायदा घेत अनेक हौशी पत्रकार व्हिडिओ चित्रीकरण करीत ब्लँकमेलींगचा व्यवसाय करीत आहेत. परंतू सोशल मिडियाच्या नावाखाली त्यावर पांघरुण पडत आहे. सदरील गुन्हा दाखल झाल्याने मात्र काहीअंशी या प्रकारावर अंकुश बसेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरीकाकडून व्यक्त केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

SCROLL FOR NEXT