file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली : जिल्ह्यात ५९ गावात आढळले दुषीत पाण्याचे नमुने

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. प्रयोग शाळेत तपासणीअंती जिल्ह्यातील ५९ गावामधील दुषीत पाण्याचे नमुने आढळून आले आहेत. या गावात ग्रामपंचायतला खबरदारी घेण्याच्या सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासणी केली जाते . प्रत्येक वेळी तपासणीत दुषीत पाणी आढळल्यानंतर संबंथित ग्रामपंचायतांना पाणी शुध्दीकरण करण्याच्या सुचना दिल्या जातात. तरी देखिल जिल्ह्यातील सर्व गावांना शुध्द पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाण्याचे नमुने घेवून जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील एकुण २४ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत एकुण ५५९ गावातील पाणी नमुने अनुजिव तपासणी करीता प्राप्त झाले होते. त्यापैकी ५९ पाणी नमुने दुषीत आढळले. दुषीत पाणी नमुन्यांची टक्केवारी ( १० ) इतकी आहे. 

जिल्ह्यातील पाणी पिण्यास अयोग्य आढळलेल्या गावांची स्रोतनिहाय पुढील प्रमाणे औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज, डेंगज तांडा, सारंगवाडी, राजदरी, आमदरी, जामगव्हाण, वसमत तालुक्यातील दामडी, हिंगोली तालुक्यातील वैजापुर, हानवतखेडा, उमरा, नादुरा, ब्रम्हपुरी, चिंचाळा, खांबाळा, कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ, नवखा, तुप्पा, तरोडा, ढोलक्याची वाडी, झरा, पोतरा, तेलंगवाडी, बोल्डा, येहळेगाव ( गवळी), गोरलेगाव, कामठा, घोडा, येलकी, सेलसुरा, टाकळगव्हाण, वारंगा मसई, जामरुण, खारवड, मसोड, उमरा, राजुरा, मुंढळ, डिग्गी, सेनगाव तालुक्यातील कोडवाडा, सिंदगीखाबा, धानोरा, डोंगरगाव, सालेगाव, उटी पुर्णा, जामदया, जामआध, नागमाथा , गोरेगाव, कहोळी, माझोड, गायखेडा या एकुण ५९ गावातील बोअर, हातपंप, विद्युत पंप, भारत निर्माण विहिरीतील दुषीत पाण्याचे नमुने आढळून आले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT