file photo 
मराठवाडा

हिंगोली : जिल्ह्यात पाच हजारपेक्षा अधिक योध्यांना कोरोना लसीकरण

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात दोन टप्प्यात १२ हजार १५० कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्याने लसीकरण सुरु आहे. ता. १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ५० योद्धांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या परीचारीका वसतीगृहात एक हजार ८०७, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात एक हजार १३०, वसमत उपजिल्हा रुग्णालयात ७७६, औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात ५५२, सेनगाव ग्रामीण रुग्णालयात ३९९, गोरेगाव प्राथमीक आरोग्य केंद्रात २१०, हट्टा आरोग्य केंद्रात १३२, शिरड शहापूर केंद्रात ४४ अशा एकूण पाच हजार ५० योद्धांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. शनिवारी १८७ योद्ध्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. बारा हजार १५० लस टप्याटप्याने योद्ध्यांना दिली जाणार आहे.

४३ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ५८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला

दरम्यान, रविवारी ( ता. १४) जिल्ह्यात नव्याने पाच रुग्ण आढळून आले आहेत. सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेले पाच रुग्ण आरटीपीसीआर टेस्टमध्ये आढळून आले आहेत. सहा रुग्ण बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण तीन हजार ८११ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी तीन हजार ७१० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ४३ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ५८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT