Ganja Trees Seized In Hingoli esakal
मराठवाडा

Hingoli : वसमतमध्ये साडेसहा लाखांची १४३ गांजाची झाडे जप्त

शेतात हळदीच्या पिकांत गांजाची झाडे, शेतमालकास पोलिसांनी घेतले ताब्यात

राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत (Vasmat) तालुक्यातील गुंडा शिवारात एका शेतातून हळदीच्या पिकात साडेसहा लाख रुपये किंमतीची १४३ गांजाची झाडे (Ganja Trees) हट्टा पोलिसांनी बुधवार (ता.एक) जप्त करून शेतमालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुंडा शिवारात एका शेतात हळदीच्या पिकांत गांजाची झाडे (Hingoli) असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांना मिळाली होती.त्यानंतर बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कांबळे यांच्यासह श्री. मोरे यांनी गुंडा येथे छापा टाकला असता एका शेतात हळदीच्या पिकात साडेसहा लाख रुपये किंमतीची १४३ गांजाची झाडे त्याचे वजन ७६.६९ किलो हट्टा पोलिसांनी बुधवारी जप्त करून शेतमालक उतम भालेराव याला ताब्यात घेतले आहे.

पुढील कारवाई उशीरापर्यंत सुरू होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, येतीष देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, श्री.पठाण, अरविंद गजभार, राजाराम कदम, गणेश लेकुळे, सुमेध कांबळे, मदार शेख, श्री. वाघ श्री.वळसे, श्री.चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT