Hingoli crime news 
मराठवाडा

हिंगोली : चोरट्यांनी डॉक्टरच्या मुलाला गळ्याला सुरा लावून केली पैशाची मागणी

लाखो रुपये सह सोन्या चांदीचे दागिने पळविले

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर : येथील नवीन बसस्थानक परिसरात असलेल्या एका डॉक्टर दांपत्याच्या घराचं चॅनल गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत घरात प्रवेश करून डॉक्टरच्या सात वर्षांच्या मुलाच्या गळ्याला सुरा लावून पैशाची मागणी करीत नगदी रुपयासह सोन्या चांदीचे लाखो रुपयाचा देवच चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी ता.२४ भल्यापहाटे घडली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील नवीन बस स्थानक परिसरातील डॉ. सचिन देशमुख यांचा दवाखाना आहे. ते व त्यांची पत्नी दोघेही स्वतःच्या रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करतात दोन मजली घर असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यात दवाखाना चालतो तर वरच्या मजल्यावर देशमुख कुटुंबीय राहतात. रविवारी भल्यापहाटे दोन ते अडीच च्या सुमारास एक वाहन दवाखान्या समोर उभे राहून त्या वाहनातून चार ते पाच अज्ञात चोरट्याने दवाखान्याजवळ येऊन दवाखान्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी चॅनेल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक विशाल होळके यास मारहाण करून गंभीर जखमी केले व वरच्या मजल्यावर जाऊन डॉक्टरच्या बेडरूमच्या दरवाज्याला लाथा मारून तो तोडून आत प्रवेश केला. डॉक्टर देशमुख हे कुटुंबीयासह झोपलेले असताना त्यांना उठवून त्यांच्या सात वर्षाचा मुलगा श्रेयश देशमुख याला एका चोरट्याने जवळ घेत त्याच्या गळ्याला सुरा लावून हिंदी भाषेमध्ये "जो कुछ है जल्दी दे दो वरना बच्चे को मार दूंगा" अशी धमकी दिली डॉ. देशमुख कुटुंबीय घाबरून जाऊन काही कळण्याच्या आत त्यांनी स्वतःला सावरत कपाटात ठेवलेले नगदी तीन लाख रुपये व सहा तोळे सोने काढून दिले चोरट्याने एवढ्यावरच न थांबता संपूर्ण कपाटाची बेडरूमची पाहणी करत सगळे कपडे काढून पाहीले.

त्यांना काहीच मिळत नसल्याने त्यांना मिळाले नगदी ऐवज घेत पळ काढला, या घटनेने हादरून गेलेल्या डॉ. देशमुख कुटुंबियांनी बाळापुर पोलीस स्टेशनला व डॉक्टर मित्रांना फोन करून घडलेली माहिती दिली.

सकाळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख,फौजदार शिवाजी बोंडले यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान श्वानपथक व फिंगरप्रिंटच्या पथक दाखल झाले फिंगर प्रिंटच्या अधिकाऱ्यांनी कपाट व परिसराची पाहणी केली परंतु श्वान पथकाने दवाखाने परिसरात बाहेर माग काढला नाही,सध्या पावसाळा सुरू असल्याने श्वान पथकाला यश आले नाही त्यानंतर गुन्हे अन्वेष विभागाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनीही पथकासह पाहणी केली, यानंतर आखाडा बाळापूरच्या रामनगर व चेतननगर आदी परिसरातही चोरट्यानी फिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे असे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान डॉक्टर दांपत्याच्या घरात पडलेल्या दरोड्यामुळे आखाडा बाळापूर सह परिसरात ग्रामस्थ अधिकारी व्यापाऱ्यात चांगलीच भीतीचे वातावरण पसरले आहे. डॉ. सचिन देशमुख यांच्या दवाखान्यातील सुरक्षा रक्षक विशाल होळके हा चोरट्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT