अवैध वाळूप्रकरणी एका महिन्यात ३८ गुन्हे दाखल Sakal
मराठवाडा

Hingoli Crime News : अवैध वाळूप्रकरणी एका महिन्यात ३८ गुन्हे दाखल

जिल्ह्यात महसूल प्रशासनाने दोन कोटी रुपयांचा आकारला दंड

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळु उपसा प्रकरणी धरपकड सुरु केल्याने एका महिन्यात ३८ गुन्हे दाखल करत १३० ठिकाणी कारवाया करून दोन कोटी रुपयांचा दंड आकारल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान या संदर्भात आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी अवैध वाळू उपसा तसेच इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले होते. तसेच वेळोवेळी या संदर्भात निवेदन देखील दिल्यानंतर महसूल प्रशासन सरसावले त्यांनी कारवायांचा धडाका सुरू केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाने १३० कारवाया केल्या, कुठे साठा जप्त केला तर कुठे वाहनासह वाळू जप्त केली. यात ३८ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक २२ गुन्हे हे हिंगोली तालुक्यात आहेत.

तर तालुक्यातील आहेत. तर, कळमनुरी १२, वसमत दोन, सेनगाव एक, औंढा एक, यामध्ये २५ आरोपींना अटक करण्यात आली होती. यात हिंगोली २३, कळमनुरी एक तर औंढा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. यामध्ये औंढा तालुक्यात एका वाळू माफियांनी हल्ला केल्याचे प्रकरण घडले आहे.

दंड वसूल आणि वाहन जप्तीचा धडाका

तालुका निहाय वसूल केलेला दंड पुढीलप्रमाणे हिंगोली पाच लाख २२ हजार, सेनगाव १३ लाख तेरा हजार, कळमनुरी १५.६५, वसमत ६१.०८, तर औंढा २० लाख ४४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. प्रशासनाने वाहन जप्तीचा धडाका लावला असून यात वसमत ४५, कळमनुरी २३, ओढा न१०, सेनगाव २ तर हिंगोलीत केवळ एकच वाहन जप्त केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत दहा ते पंधरा हजार वाहनांवर. कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे झाले नाही. प्रशासनाने कारवाई सुरू केली हे बरे झाले.

- आमदार तान्हाजी मुटकुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT