file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात २९ शेतकरी कृषीपंपाच्या थकबाकीतुन मुक्त

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  ऊर्जा विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनापासून राज्यभरात सुरू करण्यात आलेले महाकृषी ऊर्जा अभियान २०२० हे शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारे ठरत आहे . या अभियानाच्या माध्यमातून संधीचा फायदा घेत हिंगोली जिल्ह्यातील २९ कृषिपधारक शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून  थकीत असलेले वीजबील एकरकमी भरून  थकबाकीमुक्त झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या विजपुरवठयाच्या विविध अडचणींचा अभ्यास करून शेतकयांना शाश्वत शेती करता यावी या उद्देशाने या नवीन अभियानाची सुरवात करण्यात आली आहे . उपविभागातील या अभियानांतर्गत ३० मीटरच्या आत उपविभागातील असलेल्या सर्व कृषीग्राहकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे . तसेच ज्या कृषीपंप  अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या २०० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता भरत उपलब्ध आहे अशा नवीन कृषीपंप ग्राहकांना तीन महिण्याच्या आत नवी गोडणी देण्यात येईल , २०० ते ६०० मीटरच्या आत असलेल्या कृषीग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

नवीन वीज जोडणीसोबतच कृषीपंप वीज देयक सवलत धोरण राबविले जात आहे . वर्षापुर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या कृषीपंप थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच पाच वर्षापर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकी वरील संपुर्ण बिलंब आकार माफ होईल तसेच व्याजदरात सवलत देण्यात येईल. त्यामुळे थकबाकीदार कृषीपंप ग्राहकांनी या संधीचा लाभ घेवून अख्ये गाव थकबाकी मुक्त करावे असे अभियान

महावितरणच्या वतीने गावोगावी राबवून  जात आहे. अभियाना अंतर्गत वीजजोडणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी थकीत रकमेवरील विलंब आकार माफ व व्याजामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळे या अभियानाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

SCROLL FOR NEXT