Agriculture Festival sakal
मराठवाडा

Hingoli News: हिंगोलीत चारदिवसीय जिल्हा कृषी महोत्सव

२५ ते २८ मार्च या कालावधीत कार्यक्रमांची असेल रेलचेल

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर २५ ते २८ मार्च या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पैनगंगा, कयाधू, पूर्णा या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला हिंगोली जिल्हा आहे. हा जिल्हा हळद या पिकासाठी महाराष्ट्र राज्यात सर्वात अग्रगण्य आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, हळदीसह इतर कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य पिकांनाही शाश्वत बाजार भाव मिळावा. शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी.

शेतकरी, राज्य पातळीवरील व विद्यापीठातील नामांकित वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा, म्हणून कृषी विभागाच्या संकल्पनेतून हिंगोली येथील रामलीला मैदानावर भव्य जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये दोनशे पेक्षा जास्त स्टॉल, परिसंवाद व चर्चासत्र, कृषी निविष्ठा, सिंचन साधने, गृहपयोगी विक्री दालन, मशिनरी व अवजारे, कृषी विज्ञान केंद्र, हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहांचा समावेश करण्यात आला आहे.

चार दिवशीय प्रदर्शनात शेतकऱ्यांना तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक क्षेत्र व विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.

तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान, उद्योगातील संधी व आव्हाने, हळद मूल्यवर्धन साखळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन बाजारभाव व भौगोलिक मानांकन, जगातील आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (मिलेट) वर्ष याबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन, शेतमालाचे खरेदी विक्रीबाबत मार्गदर्शन,

शेतमालाचे मूल्यवर्धन, उत्पादक ते खरेदीदार संमेलन, जिल्ह्यात नवीन पिके जसे ड्रॅगन फ्रूट, करवंद, करडई लागवड या पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.

जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT