crime
crime sakal
मराठवाडा

Hingoli : तोतया अप्पर जिल्हाधिकाऱ्यानी, अनेक बेरोजगारांना एक कोटी रुपयांना गंडविले

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरात तोतया अप्पर जिल्हाधिकारी म्हणून वावरणारे अमोल पजई - मराठे याच्यासह या प्रकरणात गुंतलेल्या आरोपींनी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरूणांना अनेक विभागात नोकरी जवळपास एक कोटी रुपयाने गंडविल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात बाहेर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या सतर्कतेमुळे तोतया अप्पर जिल्हाधिकारी अमोल पजई- मराठे यांच्या फसवणुकीचे मोठे प्रकरण १६ फेब्रुवारीला उघडकीस आले. या प्रकरणात अमोल वासुदेव पजई रा. जामनेर जि. जळगाव यांच्यासह अनंता मधुकर कलोरे रा. मोठी उमरी ता. अकोला व अन्य एकजणावर हिंगोली शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या दरम्यान पोलिसांनी आरोपींकडुन कारमध्ये सापडलेल्या उत्तर पत्रिकाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडुन योग्य ते उत्तरे मिळाली नाही. परंतु पोलिसांनी या व्यतिरिक्त घेतलेल्या माहितीवरून जवळपास २० ते २२ तरूणांना कृषी, महसूल, वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडुन लाखो रुपये उकळल्याचे पोलिस चौकशी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही फसवणुक जवळपास १ कोटी रुपयाची असल्याचे चर्चा आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनाजी आमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल गिरी यांच्या पथकाने तपास गतीमान केला आहे.

गुन्ह्यातील तोतया अप्पर जिल्हाधिकारी अमोल पजई-मराठे यांच्या सह अन्य दोन आरोपींना १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आरोपी अमोल पजईला जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे नेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी होणार असून या प्रकरणात अन्य दोन गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्राकडुन मिळाली आहे.

तोतया अप्पर जिल्हाधिकारी अमोल पजई - मराठे याच्यासह आरोपींनी काही बेरोजगारांची फसवणुक केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील ज्ञानेश्वर माधवराव मगर यांनी १७ फेब्रुवारीला हिंगोली शहर पोलिसात रितसर फिर्याद दिली. बीकॉम फायनल झालेले ज्ञानेश्वर मगर यांना वन विभागात वनपाल म्हणून नोकरीस लावून देण्या करिता १२ लाख रुपयाची मागणी करून गावातील एका व्यक्तीने अनंता कलोरे यांची ओळख करून दिली.

ज्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची ओळख बऱ्याच ठिकाणी आहे, त्यामुळे १०० टक्के तुम्हाला नोकरी लागणार असे आश्वासन मगर यांना दिल्याने त्यांनी प्लॉट विक्री करून अनंता कलोरे यांच्या आयडीबीआय बँकेत सहा लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर अनंता कलोरे याने मगर यांना वन विभागाचा पेपर दाखवून उत्तर पत्रिकेवर स्वाक्षरी घेतली.

या सोबतच शुभम मगर, नारायण मगर, कपिल मगर, अमर मगर, अर्चना पतंगे यांनी सुद्धा बरीच रक्कम दिल्याचे समजते. जवळपास १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयाची फसवणुक केल्याने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल मराठे उर्फ पजई, अनंता कलोरे यांच्यावर हिंगोली शहर पोलिसात शुक्रवारी रात्री दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, शनिवारी ता. १८पहाटे निलेश अग्रवाल यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये अमोल पजई-मराठे हा अप्पर जिल्हाधिकारी नसतांनीही त्याने अप्पर जिल्हाधिकारी असल्याचे सांगितले तसेच बँकेबाबत कोणत्याही प्रकारची नोंदणी तसेच परवाना नसतांना अनंता कलोरे व अन्य एकाच्या मदतीने ठेवीसाठी १७ लाख ७३ हजार रुपये घेऊन फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून हिंगोली शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT