File photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात जमिनीच्या फेरफारसाठी लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली)  : शेतीच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणा‍ऱ्या तालुक्यातील सेलसुरा सज्जाच्या तलाठी व त्याच्या सहाय्यकाला लाच लुचपत विभागाच्या पथकांनी सोमवार (ता.२१) ताब्यात घेतले आहे.  याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तालुक्यातील हातमाली येथील शेतकरी राजेंद्र गुलाबराव भोयर यांची हातमाली गाव शिवारात गट नंबर ११८ व गट नंबर १४० मध्ये शेती आहे. या शेतीच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी शेतकरी श्री. भोयर यांनी सेलसुरा सज्जाचे तलाठी श्री. बेले यांच्याकडे पाठपुरावा चालविला होता. मात्र शेतीच्या नोंदी व फेरफार करण्याकरिता तलाठी श्री. बेले व तहसील कार्यालयातील कोतवाल शेख हमीद याने शेतीच्या फेरफार व नोंदी घेण्याकरिता तहसील कार्यालयामधून आपल्या ओळखीच्या मदतीने काम करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

मात्र संबंधित शेतकऱ्याकडून लाचेची मागणी केल्यानंतर शेतकरी राजेंद्र भोयर यांनी या प्रकरणी हिंगोली येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाचे प्रभारी उपअधीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक ममता अफुने, कर्मचारी विजय उपरे, अविनाश कीर्तनकार ज्ञानेश्वर पंचलिंगे, विनोद देशमुख, तानाजी मुंडे, संतोष दुमाने, प्रमोद थोरात, रुद्रा कबाडे ,यांच्या पथकाने तपासणी केली असता पाच हजार रुपयांची लाच मारल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानंतर तक्रारदार शेतकरी राजेंद्र भोयर यांनी सोमवारी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तलाठी श्री. बेले व कोतवाल शेख हमीद यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी श्री. बेले व कोतवाल शेख हमीद यांना सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.  या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT