Hingoli Rain News sakal
मराठवाडा

Hingoli Rain News: हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा

रब्बी पिकांचे मोठे नुकसान, वीज कोसळून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Hingoli Rain News : मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा तडाखा जिल्ह्यातील विविध भागांना मंगळवारी (ता. सात) बसला. यात रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिंगोली, कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यात पावसामुळे नुकसान झाले आहे. तर, जिल्ह्यातील शिंदेवाडी येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी पहाटे वादळी वारे व मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस सुरू झाला, तो दिवसभर अधूच मधून सुरुच होता. या पावसामुळे काढणीस आलेल्या हरभरा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

तसेच आंबा व संत्रा या फळबागांचे देखील नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. वादळी वारे व अवकाळी पावसाने हिंगोली शहरासह ग्रामीण भागात काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे हिंगोली शहरात मंगळवारी दिवसभर नळयोजनेचा पाणी पुरवठा झाला नाही.

सेनगाव तालुक्यातील साखरा कापडसिंगी, धोतरा बोरखेडी, हिवरखेडा, केलसुला आदी गावांमध्येही जोरदार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, डोंगरकडा, जवळा पांचाळ, आखाडा बाळापूर, रामेश्वर तांडा परिसरात रिमझिम पाऊस झाला. हिंगोली तालुक्यातील सिरसम, बासंबा, साटंबा,

भांडेगाव, खांबाळा, बळसोंड, कलगाव, अंधारवाडी, कारवाडी, चोरजवळा, नांदुरा, नर्सी नामदेव, घोटा आदी भागात पाऊस झाला. औंढा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

शिंदेवाडी येथील विलास गव्हाने (वय ४०) हे स्वतःच्या शेतात मंगळवारी सकाळी हरभरा झाकण्यासाठी जात होते. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. विलास गव्हाने झाडाखाली थांबलेले असतानाच अंगावर वीज कोसळून गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने रिसोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs SIP: गुंतवणुकीसाठी PPF की SIP? महिन्याला 5,000 रुपये गुंतवल्यास 15 वर्षांत कुठे तयार होईल मोठा फंड? जाणून घ्या संपूर्ण गणित

iPhone सारखा मोबाईल Xiaomi 17T होतोय लॉन्च; 6500mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स, पण किंमत एकदम कमी

Vaibhav Sooryavanshi चा भारतीय संघात युरोप दौऱ्यावेळी समावेश होणार? BCCI सचिवांकडून मोठे संकेत

'त्यांनी मला स्टेजवर बोलावलं होतं आणि...' सिद्धार्थ जाधव सलमानबद्दल म्हणाला...

लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबले? अदिती तटकरेंनी सांगितली ४ मोठी कारणं! महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT