file photo 
मराठवाडा

हिंगोली : कुरुंदा येथील टोकाईगडावर साकारण्यात आली पर्यावरणपुरक गणेश मुर्ती

राजेश दारव्हेकर

कुरुंदा (जिल्हा हिंगोली) : येथे शनीवार (ता. २२) सह्याद्री देवराई वृक्षप्रेमी यांच्या वतीने टोकाईगडावर सिने आभिनेते सयाजी शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सह्याद्री देवराई परिवार व पर्यावरण प्रेमींच्या वतीने  आगळ्या वेगळ्या श्री गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण पुरक गणेशमुर्ती पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेसह साकारण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

प्राणवायू देणारं केवळ झाडं आहे. ज्याच्या वाचून कुणीच क्षणभरही जगू शकत नाही तो आॅक्सिजन वायू म्हणजे आपलं जिवन आहे. पाणी तहान भागवणारं पाणीही आपल्याला झाडाच्या माध्यमातूनच मिळतं आणि पाणी सुध्दा आपलं जीवन आहे असं मानले जाते. एकंदरीत आॅक्सिजन, पाणी आणि भर उन्हात संरक्षण करणारं झाडं आम्हाला आमचा देवच वाटतो आणि त्यामुळे  झाड या एकमात्र देवाला मानत याच भुमिकेतुन टोकाई गडावर झाडाच्या खोडातून गणपती साकारला आहे.  यासाठी पर्यावरण प्रेमी एकत्र येत हा नाविन्य पुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. 

प्रसादाऐवजी झाड सोबत देतात

परिसरातील गावकऱ्यांनी या गणेश मुर्तीचे दर्शन घेतांना आपण सर्वांनी एक काळजीही घ्यावयाची आहे ती म्हणजे, दर्शन हे दुरवरूनच घ्यावयाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर्शनाला येतांना कुठलाही प्रसाद सोबत न आणता, येतांना सोबत झाडं घेऊन यायची आहेत.

अनेक झाडांच्या रोपट्याची लागवड करून त्याचे संवर्धन केले

विषेश म्हणजे प्रसाद म्हणून केवळ  झाडंच  स्विकारण्यात येतील याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहान  वृक्षप्रेमी प्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच टोकाईगड परिसरात नवीन रोपट्याची लागवड करण्यासाठी रोपट्याचा उपयोग होणार आहे. या गडावर पर्यावरण प्रेमीने मागच्या काही वर्षांपासून अनेक झाडांच्या रोपट्याची लागवड करून त्याचे संवर्धन केले आहे. आता नव्याने या उपक्रमाला देखील प्रतिसाद मीळत असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT