file photo 
मराठवाडा

हिंगोली : रास्तभाव दुकाने आली फ्रंटवर, नागरिकांत समाधान- सरपंच डॉ. प्रीती दळवी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत  तालुक्यातील कुरुंदा येथील रास्तभाव दुकाने अडगळीत असल्याने मनमानी कारभार चालत असे, मात्र ही रास्त भाव दुकाने मुख्य बाजार पेठेत आणण्यासाठी सरपंच प्रीती दळवी यांनी तहसीलदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता .अखेर सरपंच दळवी यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने रास्त भाव दुकाने फ्रंटवर आल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

 तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कुरुंदा गावांमध्ये मागील अनेक वर्षापासून येथील राशन दुकानदारा विरोधात जनतेच्या अनेक तक्रारी  येत असल्यामुळे दक्षता समिती अध्यक्ष तथा सरपंच डॉ. प्रितीताई  दळवी यांनी वसमत तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांच्याकडे पत्रव्यवहार व सतत पाठपुरावा करून दुकाने मुख्य रस्त्यावर आणावी अशी मागणी लावून धरली होती .

राशन दुकान त्यांच्या ग्राहकांच्या इच्छेनुसार त्याच जागी ठेवण्यात येईल

त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी तहसीलदार यांनी गावातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना दुकाने मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी  आदेश बजावले होते .त्यानुसार  ग्रामपंचायत  कार्यालयात सरपंच ,ग्राम दक्षता समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्वस्त धान्य दुकानदार यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये असे ठरले की, प्रभाकर काळे यांचे राशन दुकान जुनी ग्रामपंचायत येथे तर श्री. सोनटक्के यांचे राशन दुकान साईबाबा गल्लीमध्ये सुरू करण्याचे ठरले तर श्री. अटकोरे यांचे राशन दुकान त्यांच्या ग्राहकांच्या इच्छेनुसार त्याच जागी ठेवण्यात येईल. त्यानंतर बुधवारी ता. २६  दोन्ही दुकाने नवीन जागेत स्थलांतरित झाली असून त्यांनी तेथे राशन वाटप सुरू केले .

दक्षता समितीच्या वतीने सूचना

 कुरुंदा येथे  मागील अनेक वर्षांपासून राशन दुकानदारांच्या असणाऱ्या तक्रारी, सोबत त्यांचे उद्धट भाषेत बोलणे याबद्दल त्यांना समज देऊन दुकाने वेळेवर उघडणे, दुकानात भाव फलक ठेवणे व सर्व ग्राहकांना व्यवस्थित धान्य देणे अशी समज देऊन त्यांना दुकाने सुरू करण्यास दक्षता समितीच्या वतीने सूचना देण्यात आल्या. त्यामुळे सर्व राशन ग्राहकांमध्ये समाधान झाल्याची भावना आढळून आली. गेल्या अनेक वर्षांपासून असणारी नागरिकांची मागणी पूर्ण झाली याबद्दल सरपंच व दक्षता समितीचे कौतुक होत आहे. 

या प्रकाराला गावकरी कंटाळले होते

हि दुकाने अडगळीत असल्याने लाभार्थ्यांना वेळेवर  धान्य मिळत नव्हते तसेच हि दुकाने बंदच राहत होती. या प्रकाराला गावकरी कंटाळले होते. या संदर्भात तक्रारी देखील झाल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. सरपंच प्रिती दळवी यांनी याची दखल घेत पाठपुरावा केला. त्यामुळे लाभार्थ्यांची ही मागणी पुर्ण झाली. अडगळीत असलेली रास्तभाव दुकाने मुख्य रस्त्यावर आली आहेत. याचा फायदा आता लाभार्थ्यांना होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT