file photo 
मराठवाडा

हिंगोली : मशागत करताना ट्रक्टरसह विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कस्बेधावंडा येथील घटना

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शेतात ट्रँक्टरने पेरणीसाठी मशागत करीत असताना जमीन समान असलेल्या विहिरीचा अंदाज आला नसल्याने ट्रँक्टर विहिरीत पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. १० ) सकाळी नऊ वाजता कळमनुरी तालुक्यातील कस्बेधावंडा येथे घडली.

याबाबत माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील कस्बेधावंडा येथील शेतकरी सचिन मिराशे (वय २८) हे त्यांच्या स्वतः च्या शेतात ट्ँक्टरच्या सहाय्याने रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागत करीत होते. सकाळी आठ वाजता ते शेतात गेले होते.

मशागत करीत असताना त्यांच्या शेतात जमीन लेवल असलेली विहीर त्यांच्या लक्षात आली नसल्याने ते टँक्टरसह विहिरीत पडले विहिरीत भरपूर पाणी असल्याने ते खोलवर गेले या त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना शेजारच्या शेतकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच ही माहिती त्यांच्या घरी कळविली. नंतर घटनास्थळी त्यांच्या कुटुंबीयासह गावकरी धावले. विहिरीत पडलेले टँक्टर बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणली त्यानंतर टँक्टर विहिरीच्या बाहेर काढले. त्यानंतर विद्युत मोटार लावुन विहिरीतील पाणी बाहेर काढल्यावर सचिन मिराशे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान सचिन मिराशे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

बाबो! प्राजक्ता माळीनं गोरेगावमधील फ्लॅट तब्बल 'इतक्या' कोटींना विकला; व्यवहारामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात!

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक संथ

Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

SCROLL FOR NEXT