विद्या अंकुश कायंदे sakal
मराठवाडा

Hingoli : शेतकरी कुटुंबातील मुलीचे विक्रमी यश

विद्याच्या या यशा मागे तिच्या भावाचा सिंहाचा वाटा आहे.

सकाळ वृत्तसेवा

साखरा : तालुक्यातील साखरा गावातील शेतकरी कुटुंबातल्या तरुणीची कर निरीक्षकपदी निवड झाली आहे. तिने राज्यात मुलींमध्ये सहावा क्रमांक मिळविल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या २०२१ च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात सेनगाव तालुक्यातील साखरा येथील विद्या अंकुश कायंदे या शेतकरी कुटुंबातील मुलीने मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. साखरा गावासारख्या ग्रामीण भागातून विद्याने मेहनतीच्या जोरावर आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केले आहे.

एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसआयटी परीक्षेत विद्याला २७७.५ मार्क मिळाले आहेत. या गुणांसह विद्याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. २०२१ साली विद्याने सदरील परीक्षा दिली होती. विद्याच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. शेतकरी कुटुंबातील विद्या ही सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार होती. तिने सुरुवातीचे दहावीपर्यंतचे शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. नंतर १२ वी पर्यंत तिने परभणी येथील नवोदय विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. सध्या ती साखरा येथे ग्रामीण डाक सेवक या पदावर कार्यरत आहे. ही नोकरी करत तिने एमपीएससीपरीक्षा दिली होती.

यशामागे भावाचा सिंहाचा वाटा

विद्याच्या या यशा मागे तिच्या भावाचा सिंहाचा वाटा आहे. विद्या लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. विद्याचा भाऊ विकास कायंदे यांनी स्वतःचे शिक्षण कमी केले. मात्र आपल्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन तिला अधिकारी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT