आमदार राजू नवघरे  sakal
मराठवाडा

Hingoli : शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा

वसमत येथे आमदार राजू नवघरे यांचे ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

वसमत : महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या विरोधात आमदार राजू नवघरे आक्रमक झाले. त्यांनी मंगळवारी (ता. २१) कार्यकर्त्यांसह महावितरण कंपनीच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले.

थकबाकीच्या नावाखाली कृषीपंपाची वीज तोडणी महावितरण करीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची हेळसांड होत आहे. आधीच निसर्गाच्या

दुष्टचक्रात नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या कारवाईने मेटाकुटीस आणले आहे. यावर आमदार नवघरे यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांसह मंगळवारी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वीज देयक थकबाकीचे सुलभ हप्ते पाडून देण्याची सूचनाही यावेळी आमदार नवघरे यांनी केली.

वीज तोडणी बंद करून शेतकऱ्यांस वेठीस धरण्याचा प्रकार तत्काळ बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी महावितरणला दिला. आंदोलनात शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT