file photo 
मराठवाडा

हिंगोली : अवैध वाळु वाहतुकीचे चार ट्रक्टर पकडले, २३ लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील इडोळी ते साटंबा जाणाऱ्या भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी(ता.१२) अवैध वाळुची वाहतूक करणारे चार टँक्टर पकडून वाळूसह २३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील वाळुच्या चोरटी विक्रीचे वाढते प्रमाण पाहता पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, स्धानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळूची होत असलेली चोरटी विक्री करणाऱ्या लोकांवर गुन्हे करण्यासाठीची मोहिम राबविणे सुरु केले आहे.  

शुक्रवारी सदर पथकाला मिळालेल्या माहिती द्वारे दोन गुन्हे दाखल  करून एकुण चार ट्रक्टर पकडुन २३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून हिंगोली ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. सदर कारवाईत इडोळी ते साटंबा जाणारे रोडवर वाळुची ट्रॅक्टरने चोरटी वाहतुक करीत असतांना चालक उत्तम चक्के, वैजनाथ  डोल्हारे,  कैलास  करडीले, मंगेश डोल्हारे सर्व रा. इंचा ता. जि. हिंगोली हे अवैध्यपणे  वाळू गौण खनिजाची विना परवाना चोरटी विक्रीकामी चार ट्रक्टर, चार सलग्न ट्रॉली व प्रत्येकी एक ब्रास असे एकुण चार ब्रॉस वाळु  वाहतुक करत असतांना मिळून आले.

त्यांच्ये ताब्यातुन मिळुन आलेल्या एकुण चार ब्रास रेती वाळु किंमती २० हजार एकुण चार  ट्रक्टर , चार  सलग्न ट्रॉली किंमत २२ लाख ८० हजार रूपये असा एकूण २३ लाख  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तम  चक्के,  वैजनाथ डोल्हारे,  कैलास करडीले, मंगेश डोल्हारे,  नारायण डोल्हारे, मालक बंडु कन्हेरकर , शिवाजी डोल्हारे सर्व रा . इंचा यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, संभाजी लकुळे, भगवान आडे, राजु ठाकुर, दिपक पाटील, आकाश टापरे, चालक शेख जावेद यांच्या पथकाने केली आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT