file photo 
मराठवाडा

हिंगोली : मेथा येथील गजानन जागृत देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान

राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा येथील गजानन जागृत देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून या गावात सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जात नाही. घरोघरी स्थापना केलेल्या गणपतीचे विसर्जन न करता त्याची कायम पुजा करण्याची परंपरा आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा गावात असलेले गजानन जागृत देवस्थान हे सर्व दूर परिचित आहे. येथे वर्षे भरात दोन वेळेस सप्ताह होतो. गणेशोत्सवात देखील सप्ताह होतो. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे कार्यक्रमावर बंधन आल्याने साधेपणाने कार्यक्रम होत आहेत.

सप्ताहात सात दिवस उपवास करण्याची परंपरा आहे

या गावात गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. तर घरोघरी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन न करता दुर्वाचे पाणी टाकून मुर्ती  देवपाटात ठेवून त्याची पूजा केली जाते. सप्ताहात सात दिवस उपवास करण्याची परंपरा आहे. तसेच गावातील माहेरवाशिणी ज्या ठिकाणी असतील तेथे सात दिवस उपवास करतात.

कोरोना संकटामुळे येथील कार्यक्रमावर बंधने

दरवर्षी अनंत चतुर्थीला येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो तर गणपतीला विड्याचा प्रसाद अर्पण केला जातो. यात विड्याचे पान व बताशाचा प्रसाद असतो. अनेक भाविक आपली मनोकामना पुर्ण करण्यासाठी गणपतीला विड्याच्या प्रसादाचा नवस बोलतात व मनोकामना पूर्ण झाल्यास विड्याच्या प्रसादाचे वाटप करतात. अनेक वर्षांची हि परंपरा आजही कायम जपली जाते. गणेशोत्सवात येथे दहा दिवस भाविकांची कायम गर्दी असते. तसेच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे येथील कार्यक्रमावर बंधने आली आहेत. शासनाचे सर्व नियम पाळत कार्यक्रम होत आहेत.

लेकी जावाई देखील या कार्यक्रमात सहभागी होतात

गणेशोत्सवात दहा दिवस येथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमात गावातील सर्व समाज बांधव सहभागी होतात तसेच परिसरातील गावातील भाविक देखील या कार्यक्रमात सहभागी होतात. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बाहेर गावी कामानिमित्त असलेले गावकरी गावी येतात. तसेंच लेकी जावाई देखील या कार्यक्रमात सहभागी होतात. अशी अनेक वर्षाची चालत आलेली ही परंपरा आजही जपली जाते. यावर्षी मात्र कोरोना संकट आल्याने साधेपणाने कार्यक्रम होत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT