Hingoli District Planning Committee Meeting sakal
मराठवाडा

हिंगोली : प्राप्त निधी वेळेत खर्च करा

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश; जिल्हा नियोजन समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी ऑनलाइन बैठक झाली. आगामी वर्षात २७० कोटी २१ लाख ७१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०२२-२३ चा प्राप्त निधी वेळेत खर्च करण्यासाठी कामांना मंजुरी देण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत प्राप्त झालेला निधीचे योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, ए.एल. बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पर्यटन स्थळांना ब दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री गायकवाड यांनी दिल्या.

२२९ कोटींच्या खर्चाला मान्यता

२०२१-२२ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी योजनेत एकूण २२९ कोटी ६२ लाख ५१ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी जिल्ह्यात विकास कामांवर झालेल्या २२९ कोटी ४३ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

शाळांसाठी काहीसा आमदार निधी द्यावा

जिल्ह्यातील सर्व निजामकालीन शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी राज्याकडून ९० टक्के निधी देण्यात येणार आहे. उर्वरित १० टक्के लोकवाटा जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील शाळा दुरुस्तीसाठी आमदार निधीतून द्यावा, अशी विनंती करण्यात आली. यावेळी आमदार नवघरे यांनी बाभूळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray and Eknath Shinde : आजचे वैरी उद्याचे मित्र!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सेना कोकणात आली एकत्र; राणे बंधुंची भूमिका काय?

Belagav Farmers Protest : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दगडफेकीत सहा पोलिसांसह अनेक जण गंभीर जखमी

अखेर बावनकुळेंच्या खात्याला जाग; फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरणाऱ्या पार्थ पवारांच्या कंपनीला ४२ कोटींची नोटीस

Latest Marathi News Live Update : मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

अनन्या पांडेच्या जागी नवी अभिनेत्री? अमृता शेरगिल बायोपिकमध्ये तान्या मानिकतला?

SCROLL FOR NEXT