हळदवाडी गावात जाण्यासाठी देश स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही sakal
मराठवाडा

हिंगोली : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार हळदवाडीचा रस्ता

ग्रामस्थांच्या उपोषणानंतर कामास प्रारंभ

राजेश नागरे

हिंगोली : तालुक्यातील हळदवाडी गावात जाण्यासाठी देश स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही. एका खासगी मालकीच्या जमिनीतून जाणाऱ्या पायवाटेचा रस्ता म्हणून वापर केला जात आहे. दरम्यान, गावात रस्ता व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने रस्त्याचे आश्वासन दिल्याने उपोषण सुटले. आता मंगळवारी (ता. सात) नारळ फोडून रस्ता कामास सुरुवात झाली.

तालुक्यातील नर्सी नामदेव गट ग्रामपंचायत असलेल्या हळदवाडी या पन्नास ते साठ घरे असलेल्या गावाला मागील स्वातंत्र्य काळापासून पक्का रस्ता नसल्याने येथे जाण्यासाठी प्रशासनाने रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी येथील ग्रामस्थांकडून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ता. एक जूनपासून बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाला नर्सीचे सरपंच, आजी-माजी आमदार व जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय संघटनेचे प्रतिनिधी यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. तीन दिवसांच्या उपोषणानंतर अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावाला रस्ता उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले.

त्यानंतर उपोषण सोडण्यात आले होते. प्रशासनाच्या लेखी आश्वासनाप्रमाणे सोमवारी येथील वैजापूर पांदण रस्ता मार्ग ते हळदवाडी या रस्त्याची तहसील कर्मचाऱ्यांनी पाहणी करून या ३३ फूट रुंद रस्त्यास मंजुरी दिली. मंगळवारी या रस्त्याच्या कामास सुरुवातही झाली. यावेळी नर्सीचे सरपंच आसिफखान पठाण, ग्रामपंचायत सदस्य गीताबाई गाडे, डॉ. रमेश शिंदे, शाहीन पठाण, अब्दुल रहीम, संतोष पातळे, बंडू गुगळे, पांडुरंग गुगळे, मारोती गुगळे, नामदेव गाडे, रुख्मिणा गुगळे, सरस्वती शिंदे, सुभिद्रा टेकाळे, इंद्रायणी काळे, भाग्यश्री गुगळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra : नव्या वर्षात २४ सरकारी सुट्ट्या, भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी; अधिसूचना जारी

पुणे विमानतळ बनलंय तस्करीचा अड्डा! बँकॉकवरुन आलेल्या प्रवाशाकडून २.२९ कोटींचा गांजा जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा, निवडणुकीमुळे MPSCने परीक्षेची तारीख बदलल्यानंतरही गोंधळ

Labourer wins lottery : मजुराने जिंकली १.५ कोटींची लॉटरी पण उभ राहिलं नवं संकट, घर सोडून अख्खं कुटुंबच गायब, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT