महामार्ग पोलिस चौकीच्या जागेची पाहणी करताना 
मराठवाडा

हिंगोली : येलकी येथे होणार महामार्ग सुरक्षा पोलिस चौकी

आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या येलकी शिवारातील सशस्त्र सीमा बलाच्या जवळ महामार्ग पोलिस मदत केंद्र चौकी उभारणी करण्याच्या दृष्टीने हालचाली

सय्यद अतीक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : येथून जवळ असलेल्या येलकी येथील राष्ट्रीय महामार्गावर भव्य महामार्ग पोलिस चौकी होण्यासाठी व त्या दृष्टीने उभारण्यासाठी प्रशासनाच्यावतीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. सदर महामार्ग पोलिस चौकी ही जिल्ह्यात नवीन एकमेव होणार आहे.

आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या येलकी शिवारातील सशस्त्र सीमा बलाच्या जवळ महामार्ग पोलिस मदत केंद्र चौकी उभारणी करण्याच्या दृष्टीने हालचाली होऊन त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करुन लवकरच पुढील कारवाई करुन प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने पोलिस चौकीकरिता येथील ग्रामपंचायतने नाहरकत परवानासह सर्व कागदपत्र देऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी महामार्ग पोलिस नांदेड विभागाचे पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे, उपनिरीक्षक सरपंच वनिता पतंगे, पंचायत समिती सदस्य अंजली पतंगे, ग्रामसेवक पिंटू मुधोळकर यांच्या पथकाने जागेची पाहणी करुन तसा अहवाल प्रशासन व वरिष्ठ पोलिस प्रशासनाकडे दिला आहे. सदरील महामार्ग पोलिस मदत केंद्र चौकी उभारल्यानंतर अपघाताचे प्रमाण दारु पिऊन गाडी चालवणाराचे प्रमाण व इतर लुटमारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा - कोंढा (जि. नांदेड) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली.

शिवारातील गायरान जमिनी मध्यजागेची सदरील भव्य महामार्ग पोलिस मदत केंद्र चौकी उभारण्यात येणार असल्याने निश्चितच गुन्हेगारी वृत्ती व इतर याच्यावर आळा बसण्याची दाट शक्यता आहे. यावेळी येलकी येथील जनार्दन पतंगे, दीपक पतंगे, पोलिस पाटील कैलास चोतमाल, निलेश पतंगे, स्वप्नील पतंगे यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

येलकी शिवार मधील राष्ट्रीय महामार्गावर भव्य महामार्ग पोलीस चौकी मदत केंद्र उभारण्यात येणार असल्याने त्याकरिता लागणारे सर्व कागदपत्रे मिळून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. व महामार्ग पोलीस चौकी उभारल्यानंतर रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण व वाहन दारु पिऊन चालविणारे यांचे प्रमाण व इतर गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.

- अरुण केंद्रे, महामार्ग पोलीस निरीक्षक, नांदेड विभाग.

संपादन प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

Honour Killing: साखरपुड्याच्या आदल्या दिवशी १९ वर्षीय तरुणीची हत्या; जन्मदात्या पित्यानेच आवळला गळा?

Latest Marathi News Live Update: कल्याण-डोंबिवलीत दररोज २५ दशलक्ष लिटर पाण्याची चोरी

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

Property Card: फ्लॅट खरेदी-विक्री करायचाय? मग ही बातमी वाचाच! सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ७ कोटी घरमालकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT