Santosh Bangar sakal
मराठवाडा

Hingoli : कळमनुरीत पाणीटंचाईची आढावा बैठक

कार्यारंभ झालेली कामे सुरू करा

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी : जल जीवन योजनेंतर्गत कार्यारंभ झालेल्या ठिकाणी योजनेसंदर्भात जागेच्या अडचणी दूर करून ही कामे तातडीने सुरू करावीत अशा सूचना आमदार संतोष बांगर यांनी गुरुवारी (ता. ३०) ग्रामीण पाणीटंचाई आढावा बैठकीत संबंधितांना दिल्या.

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्रामीण पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बांगर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. वाटेगावकर, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री भंगिरे, गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, अभियंता आनंद पतंगे, राजेंद्र शिखरे, रामभाऊ कदम, दत्ता बोंढारे यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांची उपस्थिती होती.

आढावा बैठकीत पाणीटंचाई आराखडा वाचन करण्यात आले. पाणीटंचाई असलेल्या गावांमधून पाणीटंचाई निवारणार्थ हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी आमदार बांगर यांनी पाणीटंचाई असलेल्या गावांमधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

सोबतच जलजीवन योजनेच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतरही जागेअभावी येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री. पाईकराव यांनी केले. आभार गटविकास अधिकारी श्री बोंढारे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT