Hingoli Kurunda Heavy rain 
मराठवाडा

हिंगोली : कुरुंदा येथे मुसधार पाऊस : जलेश्वर नदीचे पाणी अनेकांच्या घरात

गावकऱ्यांची धावपळ : अनेकांच्या घरांचे नुकसान

मारोती काळे

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे शुक्रवारी ता.आठ रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावा जवळुन वाहणाऱ्या जलेश्वर नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. या पाण्यात गुरे, वाहने वाहून गेली गावात सकाळी सात वाजेपर्यंत पाणी असल्याचे होते.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गावाजवळून जलेश्वर नदी वाहते . या नदीला संरक्षक भिंत आहे मात्र ती कमी उंचीची आहे. हे भिंत उंच करण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली मात्र ती काही झाली नाही. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे गावाजवळुन वाहणाऱ्या जलेश्वर नदीला पुर आला. त्याचे पाणी गावात शिरले आहे. दरवर्षी गावात पुराचे पाणी शिरण्याचा प्रकार घडतो यावर्षी देखील तो घडला आहे.

यापूर्वी २०१६ मध्ये कुरुंदा गाव पाण्याखाली गेले होते , तेव्हा देखील मोठे नुकसान झाले होते. यावेळी देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याने अनेकांची घरे पडली गुरे वाहून गेली शेतातील पिके वाहून गेली . आखाड्यावरील साहित्य वाहून गेले. गावामध्ये रस्त्यावर लावलेली वाहने देखील पाण्यात वाहून गेली. काहीं वाहने एकमेकाला अडकून नदी काठावर सापडली.

दरम्यान शुक्रवारी गावात आलेल्या पाण्याने गावातील जुनी मातीची घरे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. नदीला अचानक पूर आल्याने काही जणांची गुरे गोठ्यातच मरून पडली . बकऱ्या , कोंबड्याही देखील दगावल्या आहेत. या मुळे गावकऱ्यांना रात्र जागुन काढावी लागली. शुक्रवारी सकाळी देखील गावातीत रस्त्यावर पाणी असल्याने नागरिकांना रस्त्याने येता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT