Hingoli Municipal  sakal
मराठवाडा

हिंगोली नगर परिषदेचे आरक्षण जाहीर झाले ;प्रभागाकडे दिग्गजांचे लक्ष

हिंगोलीतील चित्र; अनेकांचे प्रभाग झाले आरक्षित

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली नगर परिषदेचे आरक्षण जाहीर झाले आहे. यात अनेकांचे पारंपरिक प्रभाग आरक्षित झाल्याने आता त्यांना इतर सोयीचा प्रभाग निवडावा लागणार असून, त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. प्रभाग रचनेच्या आरक्षणामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असलेले दिलीप चव्हाण यांचा पारंपारिक असलेला प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे.

आता त्यांना इतर प्रभागातून नशीब अजमावे लागणार आहे. तर, माजी नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ यांचा प्रभाग पाच हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्यांनाही परत या प्रभागात नशीब अजमावता येणार आहे. इतरही ठिकाणी अनेकांना सोयीचा प्रभाग पाहावा लागणार आहे. माजी नगरसेवक कय्यूम पठाण यांची देखील संधी हुकली आहे. इतरही काही नगरसेवकांना प्रभाग आरक्षित झाल्याने सोयीचा प्रभाग निवडावा लागणार आहे.

हिंगोली नगर परिषदेत ३४ सदस्यांत १७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. इतरही काही जागेवर महिलांना निवडणुकीस उभे राहता येणार आहे. दरम्यान, नव्याने इच्छुक असणाऱ्यांतून चैतन्य निर्माण झाले असून, त्यांनी आपल्या प्रभागात हाय, हॅलो करून व्हॉट्सॅपवर गुडमॉर्निंग करणे सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT