file photo 
मराठवाडा

हिंगोली : तीन महिण्यापासून वेतन मिळाले नसल्याने नगरपालिका कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लाऊन निषेध

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना मागच्या तीन महिण्यापासून वेतन मिळाले नसल्याने गुरुवारी (ता. एक) कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाऊन निषेध नोंदवला आहे.

येथील नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करत काळ्या फिती लावून आज कामकाज करण्यात आले. नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या मागील तीन महिन्यापासून त्यांना वेतन मिळाले नसल्याच्या कारणाने गुरुवारी हिंगोली येथील नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी काळया फिती लावून शासनाचा निषेध केला. तसेच ता. १५ एप्रिल रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणि त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास एक मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी हे कामबंद आंदोलन करणार आहेत. हिंगोली येथील नगरपालिकेच्या प्रांगणात संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी काळया फिती लावून अधिकारी कर्मचारी यांनी शासनाचा निषेध केला.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हाअध्यक्ष बाळू बांगर, उमेश हेंबाडे, श्याम माळवठकर, कनिष्ठ अभियंता तसनीम सनोबर, प्रिया कोकरे, देवीसिंग ठाकूर, गजानन बांगर, गजानन टाले, विजय शिखरे , संजय दोडल, रधुनाथ बांगर, शाहीद पठाण, संदिप कांबळे, दिनेश वर्मा, झिंगराजी वैरागडे , गजानन आठवले, नगरपालिकेतील सर्व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काळया फिती लावून निषेध केला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज सुरू केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT