file photo 
मराठवाडा

हिंगोली : पोतरा येथे जमिनीतुन गुढ आवाज; जिल्ह्यात आवाजाची मालिका सुरुच

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा व परिसरातील काही गावात सोमवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजता जमिनितुन गुढ आवाज आला. यामुळे नुकसान झाले नाही मात्र गावकरी भयभीत झाले आहेत.

पोतरा येथे मागच्या काही दिवसांपासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत दोन महिन्यात चार वेळेस हे आवाज आले आहेत. डिसेंबर महिन्यात झालेल्या आवाजाने येथील शेतकरी रामराव मुलगीर यांची शेतातील विहिरी कोसळली आहे. गावात मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. 

याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे ही माहिती दिली मात्र या बाबतचे गुढ उकलले नाही. एप्रिल महिन्यात झालेल्या आवाजाची रिश्टर स्केलवर नोंद झाली होती. यावेळी हा भुकंपाचा सौम्य धक्का असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आवाजाची मालिका सुरुच आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता गावात जमिनीतुन परत गुढ आवाज आला आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT