Hingoli Zp Sakal
मराठवाडा

हिंगोली : प्रारूप प्रभाग रचनेवर ५९ आक्षेप दाखल

जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली माहिती

राजेश नागरे

हिंगोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- २०२२ निमित्त प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने दोन ते आठ जून या कालावधीत आक्षेप दाखल करण्याबाबत संधी देण्यात आली होती. त्यानुसार एकूण ५९ आक्षेप दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक गटासाठी ४८ तर गणासाठी ११ आक्षेप दाखल करण्यात झाले आहेत.

ता. २० मार्चला जिल्हा परिषद व पाचही पंचायत समित्यांच्या सभागृहाचा कालावधी संपल्याने सद्यःस्थितीत प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. जिल्ह्यातील ५७ जिल्हा परिषद गट आणि ११४ पंचायत समिती गणाचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच सादर करण्यात आला होता. दोन जून रोजी हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

यात हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत ४४ प्रारूप प्रभाग रचना, वसमत पंचायत समिती अंतर्गत ५७ प्रारूप प्रभाग रचना, सेनगाव पंचायत समिती अंतर्गत ३४ प्रारूप प्रभाग रचना, कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत २३ प्रारूप प्रभाग रचना तर हिंगोली पंचायत समिती अंतर्गत अकरा प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. या प्रारूप प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास त्या दोन जून नंतर आठ जून या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रामपंचायत निवडणूक शाखेत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच प्रारूप प्रभाग रचनेचे अवलोकन सर्व संबंधितांनी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ५९ आक्षेप दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

तालुकानिहाय दाखल झालेले आक्षेप

तालुका गट गण एकूण

हिंगोली ४ ३ ७

कळमनुरी ११ ५ १६

सेनगाव ७ ० ७

औंढा नागनाथ १५ १ १६

वसमत ११ २ १३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : तुर्भेतील मतदान यंत्रणेमुळे मतदार हैराण

Prakash Ambedkar Prediction: महापालिका निवडणुकीचं मतदान संपण्याआधीच प्रकाश आंबेडकरांचं निकालाबाबत मोठं भाकीत, म्हणाले..

EC Press Conference: मार्करवरून गोंधळ! शाई पुसरली जात नाही; निवडणूक आयोगाचा ठाम नकार, सांगितलं- फेक नरेटिव्ह...

Mohammed Siraj झाला कर्णधार, दोन सामन्यांमध्ये करणार संघाचे नेतृत्व; कोणत्या प्रतिस्पर्धींविरुद्ध डावपेच आखणार?

Latest Marathi News Live Update : हैदराबादमध्ये दुर्गा मंदिराची तोडफोड; भाजप नेत्यांची घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT