file photo 
मराठवाडा

हिंगोली : जुन्या वादातून दाताडा बुद्रुक येथे एकाचा भोसकून खून 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे जुन्या वादातून एकाचा चाकुने भोसकून खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात सहा जणा विरूध्द गुरुवारी (ता. १०) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे दोन वर्षांपासून कैलास शिंदे यांचा खून झाला होता. तेव्हापासून शिंदे व कवडे यांच्यात दुश्मनी होती. या दोन परिवारात सुरू असलेल्या जुन्या वादातून अमोल शिंदे, मच्छिंद्र शिंदे, प्रदीप शिंदे, महादेव शिंदे, भुजंग शिंदे सर्व राहणार दाताडा खुर्द नारायण थिटे रा. हत्ता यांनी बुधवार (ता. ९) सायंकाळी दोन वर्षापुर्वी झालेल्या कैलास शिंदे यांच्या खूनाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून वाद घातला.

सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमोल शिंदे याने बटईने शेती केलेल्या शेतात जाऊन नामदेव खंडोजी कवडे वय ७० यांच्या पोटात व गळ्यावर चाकुने वार करून गंभीर जखमी करून ठार मारले. तसेच नितीन कवडे यांना काठी, लाथानी मारुन जखमी केले तसेच त्यांना दवाखान्यात नेत असताना नारायण शिंदे यांनी शिवीगाळ केली या बाबत नितीन कवडे यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर तपास करीत आहेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजने, सेनगाव येथील पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, उपनिरीक्षक अभय माकणे, जमादार अनिल भारती यांनी भेट दिली. दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर तपास करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT