sugar factory election  sakal
मराठवाडा

Hingoli : ‘पूर्णा’ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ;९ जुलैला मतदान

हिंगोलीसह नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

वसमत : हिंगोली, परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. ९ जुलैला मतदान तर ११ जुलैला मतमोजणी होणार आहे. शुक्रवारपासून (ता. दोन) नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

हिंगोलीसह नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. उत्पादन मतदारसंघात वसमत गटात तीन जागा, चुडावा गटात दोन जागा, पूर्णा गटात तीन जागा, जवळा गटात तीन जागा, वडगाव-साडेगाव गटात तीन जागा, उत्पादक सहकारी संस्था,

बिगर उत्पादक संस्था व पणन एक जागा, अनुसूचित जाती जमाती एक जागा, महिला राखीव दोन जागा, इतर मागास प्रवर्ग एक जागा, विभक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग एक जागा अशा एकूण २१ संचालक निवडून देण्यासाठी निवडणूक होणार आहे.

तहसील कार्यालयात २ ते ८ जून दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करता येणार आहे. ९ जूनला दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. १२ ते २६ जून या कालावधित उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २७ जूनला सकाळी ११ वाजता निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

९ जुलैला मतदान होणार आहे तर ११ जुलैला मतमोजणी व निकाल घोषित केला जाणार आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार अरविंद बोळंगे, किशोर दुधमल काम पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

Latest Marathi News Live Update: संघाचे कार्य संघ स्वयंसेवकांच्या श्रमाने सुरु- मोहन भागवत

SCROLL FOR NEXT