file photo 
मराठवाडा

हिंगोली : समुपदेशनद्वारे आठ आरोग्य सेवकांच्या पदस्थापना

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवक महिला, पुरुष संवर्गातील आरोग्य सहाय्यक म्हणून आठ कर्मचाऱ्यांना गुरुवारी समुपदेशनद्वारे पदस्थापना देण्यात आली.

येथील जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हया पदस्थापना करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनीष आखरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार ,आदींची उपस्थिती होती.

यांना मिळाली बढती

आरोग्य सेवक महिला या संवर्गातून पाच महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य साहाय्यीका या संवर्गात खुल्या प्रवर्गातील पाच जागेसाठी पदस्थापना देण्यात आली. यामध्ये श्रीमती प्रमिला मावळे प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा औंढा, श्रीमती शौकत बानू माहेबुब शेख प्राथमिक आरोग्य केंद्र रामेश्वर तांडा कळमनुरी,शोभा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा औंढा,चंद्रज्योती रायबोले प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव वसमत,मंगल जाधवप्राथमिक आरोग्य केंद्र पांगरा शिंदे वसमत,या पाच सेविकांची कामगिरी लक्षात घेऊन खुल्या वर्गात आरोग्य सहाय्यक म्हणून बढती मिळाली आहे.

समुपदेशन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

तर  आरोग्य सहाय्यक पुरुष संवर्गातून खुल्या प्रवर्गातील तीन जागेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार ही सर्व प्रक्रिया समुपदेशन द्वारे पार पडली. पुरुष संवर्गातून पदोन्नती मिळाल्यात पुंडलिक कुलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र टेम्भुर्णी वसमत, हरिहर गायकवाड प्राथमिक आरोग्य केंद्र नरसी हिंगोली,बळीराम दुधारे प्राथमिक आरोग्य केंद्र पोतरा कळमनुरी या तिघांना आरोग्य सेवक म्हणून उत्कृष्ट काम केल्याने आरोग्य सहाय्यक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT