file photo 
मराठवाडा

हिंगोली : कोरोना काळातही टरबूजाचे विक्रमी उत्पन्न, सांडस येथील शेतकऱ्यांचा उपक्रम

संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील सांडस येथील शेतकऱ्यांनी मागील काही वर्षाचा अनुभव पाहता यावर्षीही मोठ्या प्रमाणावर टरबुज पिकाची लावगड करुन आजाराच्या काळातही मोठे उत्पन्न मिळविले आहे. येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या टरबुजाला दिल्लीची बाजारपेठ मिळाली आहे. सांडस येथील शेतकऱ्याने ३० गुंठ्यात अवघ्या ६५ दिवसात दोन लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

सांडस येथील गजानन धावंडकर, चंद्रकांत होडबे, सुनील निरगुडे, कपिल निरगुडे, कुंडलिक निरगुडे, धोंडबा निरगुडे, रवी वाघमारे, यांच्यासह शेतकऱ्यांनी जवळपास वीस एकर शेतीवर टरबुज पिकाची जानेवारी महिन्यामध्ये मल्चिंगवर बेड पद्धतीने टरबुजाचे बियाणे लावून उत्पादन घेतले आहे. याकरता शेतकऱ्यांनी आवश्यक असलेले खत, फवारणी इत्यादी उपाय योजना गावातीलच टरबूज पिकाचे यशस्वी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून केल्या आहेत हे विशेष.

जानेवारी महिन्यामध्ये लागवड केलेल्या टरबूज पिकाचे उत्पादन आता हाताशी आले आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः टरबूज विक्रीचा निर्णय घेतला आहे तर काही शेतकऱ्यांनी ठोक भावात व्यापाऱ्यांना टरबुजाची विक्री केली आहे. गजानन धावंडकर या टरबूज उत्पादक शेतकऱ्याने अवघ्या तीस गुंठ्यात दोन लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या शेतातील टरबूज ठोक व्यापाऱ्यांमार्फत दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल झाले आहे. त्यामुळे आजाराच्या काळातही येथील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी खरिपाचा हंगाम संपताच पारंपरिक शेतीला जोड देत अवघ्या दोन ते सव्वा दोन महिन्यात टरबूज पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवले आहे.

दरम्यान, मागील काही वर्षात सांडस येथील शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामानंतर अवघ्या सव्वा दोन महिन्यात हाताची येणाऱ्या टरबूज पिकाच्या लागवडीबाबत अभ्यास करुन उत्पादन घेण्यावर भर दिला आहे. दरवर्षी टरबूज पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती संख्या पाहता सांडस येथील टरबूज खरेदीसाठी ठोक व्यापारीही शेताच्या बांधावर येत आहेत हे विशेष.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT