file photo 
मराठवाडा

हिंगोली : सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात सन २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता सरपंच पदाचे राज्यस्तरावर जिल्हानिहाय आरक्षण निश्चित केले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना तालुकानिहाय ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाबाबत कळविण्यात आले आहे.

तालुकास्तरावर मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियमा प्रमाणे  पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी तालुकास्तरावर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या आरक्षित पदाचे वाटप तालुकानिहाय करण्यात आलेले आहे. सरपंच पदाच्या आरक्षणाची (महिला पदासह) कार्यवाही करण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. नेमणूक करण्यात आलेल्या संपर्क अधिकाऱ्यांचे नाव, तालुका व आरक्षण काढण्याचा दिनांक व वेळ पुढील प्रमाणे आहे.

सेनगाव व हिंगोली तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची नेमणूक करण्यात आली असून सेनगाव तालुक्याची आरक्षण सोडत ता. नऊ नोव्हेंबर, रोजी व हिंगोली तालुक्याची आरक्षण सोडत ता. दहा  10 नोव्हेंबर, रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात येणार आहे.

वसमत व औंढा नागनाथ तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून वसमतचे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांची नेमणूक करण्यात आली असून वसमत तालुक्याची आरक्षण सोडत  नऊ नोव्हेंबर रोजी व औंढा नागनाथ तालुक्याची आरक्षण सोडत ता.दहा नोव्हेंबर, रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात येणार आहे. तर कळमनुरी तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची नेमणूक करण्यात आली असून कळमनुरी तालुक्याची आरक्षण सोडत ता. अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  दिली आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT