file photo 
मराठवाडा

Video- हिंगोली : कुरुंदा येथ़ील नदीला पूर, अनेक घरात पाणी शिरले

राजेश दारव्हेकर

कुरुंदा ( जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गुरुवारी (ता. 17) ३ रात्री तीन वाजता झालेल्या अतिवृष्टी मुळे सकाळी शुक्रवारी अनेक घरात पाणी शिरले असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी पुर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गावकऱ्यांनी रात्र जागुन काढली.

वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस मध्यरात्री धोधो बरसला यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या जलेश्वर नदीला पुर आला या नदीचा गावाला वेढा आहे. तसेच नदीचे पात्र अरुंद असल्याने नदीचे पाणी गावात शिरले यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांना रात्र जागुन काढावी लागली.

शेतातील पिकांची खरडा खरडी झाली

तसेच या पाण्याने मोठया प्रमाणावर शेतातील पिकांची खरडा खरडी झाली असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे कुरुंदा येथे पुराच्या पाण्याने वेढा घातला असून  गणेशनगर  आरामिशन, साईबाबा नगर, साठेनगर, श्रीवास्तव, लहुजी नगर, संत तुकाराम महाराज मंदिर आदी भागांतील घरात पुराचे पाणी शिरल्याने अनेकाचे धान्य, कपडे,संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. 

येथे २०१६ च्या ढगफुटी नंतर पुन्हा पूरचा फटका

नदीचे पात्र ओलांडून रस्त्याने पाणी वाहत होते.त्याच बरोबर दुर्गा माता मंदिरला पुरच्यां पाण्याने वेढा घातला होता. येथे २०१६ च्या ढगफुटी नंतर पुन्हा पूरचा फटका कुरुंदा वासीयांना बसला आहे. यावेळी देखील या नदीला मोठा पुर आला होता. त्यावेळी अनेक घरांचे नुकसान झाले तसेच शेतीचे देखील नुकसान झाले होते.  सध्या पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein Files: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ‘काळा इतिहास’ उघड; कागदपत्रे कोण प्रकाशित करत आहे? नेमकी सुत्रे कुणाच्या हाती?

Epstein File Controversy : एपस्टीन फाईल भारताच्या राजकारणाला हादरवणार? फाईलमध्ये PM मोदींचं नाव? पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक दावा

India Sqaud Against NZ: शुभमग गिलला वगळले, मग उप कर्णधार कोणाला केले? न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

Thane Traffic: मतमोजणी दिवशी बदलापूर ‘अलर्ट मोड’वर, वाहतुकीत मोठे फेरबदल, नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन!

Manmad News : मनमाडमध्ये नायलॉन मांजाचा थरार! प्रसिद्ध महिला डॉक्टर गंभीर जखमी, गळ्याला पडले २५ टाके

SCROLL FOR NEXT