rain sakal
मराठवाडा

Hingoli : ओढ्याचे पाणी घरात घुसून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान

बाळापूर मंडळात मागील चोवीस तासात २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर : येथील बाळापुर वाडी येथील ग्रामस्थांना दरवर्षी जसा पावसाळा सुरू झाला तसा जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. वाडी शेजारी असणाऱ्या ओढ्यावरील पुलाची उंची न वाढविल्याने बुधवार ता.१३ ओढ्याचे पाणी तुंबून जवळ असणाऱ्या ग्रामस्थांच्या घरात घुसल्याने संसार उपयोगी साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे. बाळापूर मंडळात मागील चोवीस तासात २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आखाडा बाळापूर येथील वाडी हा प्रभाग दोन मध्ये येणारा भाग आहे. येथून एक ओढा जातो या ओढ्यावरुन जाण्यासाठी मागील वीस वर्षांपूर्वी पुल बांधण्यात आले होता. तेव्हा पुलाची उंची चांगली होती व घरातही ग्रामस्थांच्या पाणी घुसत नव्हते परंतु दिवसेंदिवस उंची कमी होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून ओढ्याचे पाणी जात आहे. ओढ्यात केर कचरा झाडी जमा झाल्याने पाणी तुंबत आहे. व तुंबलेले पाणी हे शेजारी असणाऱ्या जवळपास तिस ग्रामस्थांच्या घरात घुसून घरात ठेवलेले संसार उपयोगी साहित्याची व इतर वस्तूंची दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

या ओढ्यावरील फुलाची उंची वाढवावी यासाठी अनेकदा भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आले आहे परंतु प्रत्यक्ष कामास आत्तापर्यंत सुरुवात केली नसल्याने येथील ग्रामस्थांना जसं जसा पावसाला तसं तसं जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पावसाळा पडत असल्याने रात्री न झोपता पावसाच्या पाणी कधी घरात घुसले या भीतीने घरात रात्र जागून काढावे लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

मागील तीन दिवसापासून सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ पर्यंत बाळापूर मंडळात २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे या मंडळात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाच्या पाण्याने ओढ्यावरील पुलावर पाणी मोठ्या प्रमाणात जमा होऊन परिसरातील ग्रामस्थांच्या घरात घुसलं आहे त्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करून पावसाळा संपतच प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT