Hingoli Sarkali Pati tempo car accident One dead one injured sakal
मराठवाडा

हिंगोली : सरकळी पाटीजवळ टेम्पो कारचा अपघात एक ठार, एक जखमी

कारमधील व्यक्तींना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली ते सेनगाव मार्गावर सरकळी पाटीजवळ भरधाव टेम्पोने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. कारमधील व्यक्तींना जेसीबीच्या साह्याने दरवाजे वाकवून बाहेर काढण्यात आले.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली येथून शुक्रवारी सकाळी कार क्रमांक जीजे २७- एए ०१८० सेनगाव कडे निघाली होतु. हिंगोली ते सेनगाव मार्गावर सरकळी पाटीजवळ कार आली असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने क्रमांक एमएच २१- एक्स २३७५ याने कारला समोरासमोर धडक दिली. येथे मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यात कार मध्ये दोघेजण अडकून पडल्याचे दिसले. तसेच घटनास्थळी नर्सी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नागरे , जमादारश्री. महाजन यांनी धाव घेऊन जेसीबीच्या साह्याने कारचे दरवाजे वाकवून कार मधील त्रदोघांना बाहेर काढले. यामध्ये मनोज देसाई रा. जुनागढ गुजरात हे गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

यामध्ये अनेक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . दरम्यान, टेम्पो चालकाने टेम्पो घटनास्थळ सोडून पळ काढला. याप्रकरणी जखमींचा जवाब घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT