shivsena sakal
मराठवाडा

Hingoli : कोण बनेगा शिवसेना जिल्हाप्रमुख?

उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुखांचे नाव आघाडीवर

राजेश नागरे

सेनगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवले. दरम्यान, मातोश्रीसोबत असलेल्या हिंगोली जिल्‍ह्यातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आता जिल्हा प्रमुख कोण होणार, याची उत्सुकता लागली. या पदासाठी उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. श्री. देशमुख मातोश्रीशी एकनिष्ठ असून, त्यांच्यासोबत तरुणांची मोठी फळी आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट केला. त्यांच्या गटात जिल्हाप्रमुख आमदार बांगर गेले. त्यामुळे बांगर यांना जिल्हा प्रमुख पदावरून काढण्याची घोषणा मातोश्रीवरून झाली. पण, दुसरीकडे ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तुम्हीच’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बांगर यांना सांगितले. त्यामुळे हिंगोली

जिल्ह्यातही शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. आमदार बांगर यांच्यासोबत अनेक जण शिंदे गटात सामील झाले. दरम्यान, पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी अधिकार पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर कुणाची वर्णी लावतात. याकडे लक्ष लागले असून, अनेक इच्छुकांनी त्यासाठी मातोश्रीवर फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, उपजिल्हा प्रमुख श्री. देशमुख निष्ठेने मातोश्रीसोबत आहेत. मनसेपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. पण, मनसेत ते फार रमले नाहीत. विद्यार्थी नेता ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख हा त्यांचा प्रवास संघर्षाचा आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदासाठी सध्या तरी त्यांचे एकमेव नाव चर्चेत आहे.

धमक्या दिल्याचा आरोप

जिल्हाप्रमुखपदासाठी धडपड सुरू असतानाच देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, निष्ठावंत शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

देशमुख यांच्या जमेच्या बाजू

देशमुख सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. अनेक आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. बेग्या पवार हत्या प्रकरणात त्यांनी केलेले आंदोलन राज्यभर गाजले होते. ते जिल्ह्यातील शिवसेनेचा युवा चेहरा आहेत. सध्या जिल्ह्यातील काही जुने शिवसैनिक आमदार बांगर यांच्यासोबत आहेत. त्यामुळे देशमुख यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाली तर युवा सेनेला बळकटी येणार आहे. देशमुख यांनी सेनगाव तालुक्यात शिवसेनेने संघटन वाढवले असून, सेनगाव नगरपंचायत आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या गटाचे वर्चस्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT