file photo 
मराठवाडा

हिंगोलीला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा- खासदार हेमंत पाटील

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा  निर्माण झाला असून परिणामी रुग्णाच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ बाब म्हणून रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघ आणि आणि प्रामुख्याने  हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात  रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आहे. परंतु ज्या रुग्णाना कोरोनाचा फुफ्फुसापर्यंत संसर्ग झाला आहे त्यांच्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन परिणामकारक ठरत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून  या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जिल्हा सामान्य रुग्णालयात होत आहे. या इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने बाहेरून मागविण्याची सोय नाही परिणामी  ज्या रुग्णाना कोरोनाचा खोलवर संसर्ग आहे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा

याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी लक्ष देऊन पाठपुरावा केला आहे. या संदर्भात  राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांना पत्रव्यवहार करून हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी विशेष बाब म्हणून तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.  

रुग्णाना बेड उपलब्ध करून देणे

तसेच रुग्णाना बेड उपलब्ध करून देणे, सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा करणे, गरजूंना धान्य वाटप करणे, लॉकडाऊन मध्ये बाहेर  देशात आणि  परराज्यात अडकून पडलेल्याना परत आणण्याचे काम केले आहे. कोरोनाकाळात संपूर्ण मतदारसंघाचा  अनेक वेळा दौरा करून सर्वच आरोग्य केंद्राची पाहणी करून कमी असलेल्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत आणि ते सातत्याने आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT