file photo 
मराठवाडा

हिंगोली : बळसोंड ग्रामपंचायतने दडवून ठेवलेल्या २१५ निर्धूर चुलीतून निघाला धूर; काय आहे प्रकरण वाचा ?

राजेश दारव्हेकर

हिंगोली : अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेलगत असलेल्या एका खोलीत शेगड्या असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आल्याने पप्पू चव्हाण यांनी तातडीने ग्रामसेवकाना माहिती दिली. अन ग्रामपंचायतने पंचनामा करुन २१५ निर्धूर चुलीच्या शेगड्या मंगळवारी (ता. नऊ) जप्त केल्या.

अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या ग्रामपंचायत सभागृहाची नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य पप्पू चव्हाण यांच्यासह सदस्यांनी मंगळवारी अचानक पाहणी केली असता त्यात निर्धूर शेगड्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पंचायत समिती अंतर्गत गावातील गोरगरीब कुटुंबाना शासना अंतर्गत अंदाजे पाचशे शेगड्या आल्या होत्या. त्यापैकी काही शेगड्या तत्कालीन ग्रामपंचायत सरपंचाने जवळीक असणाऱ्या कुटुंबाला काही मोबदल्यात उर्वरित निर्धूर  शेगड्या वाटप न करताच एका ग्रामपंचायतच्या मालकी हक्काच्या खोलीत दाबून ठेवल्या होत्या.

मंगळवारी बळसोंड भागातील भाजपच्या काही कार्यकर्त्याना ही माहिती मिळाली. मालकी हक्क गाजवत असलेल्या माजी सरपंचाला गाठून त्या घराचे लॉक उघडण्यास सांगितले, परंतू त्यांनी नकार देतात भाजपच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला यानंतर कार्यकर्त्यांनी खिडक्या तोडून आत प्रवेश केला असता दडवून ठेवलेल्या २१५ निर्धूर शेगड्याचे बिंग फुटले, यावेळी माजी सरपंच व भाजपच्या कार्यकर्त्यांत धूमचक्री उडाली. ग्रामपंचातमध्ये पाच साक्षीदारासमोर हिंगोली ग्रामिण पोलिसांनी पंचनामा केला. मात्र याप्रकरणी कोणतीही तक्रार अद्यापपर्यंत झाली नव्हती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT