कबड्डी  sakal
मराठवाडा

Hingoli : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी

हिंगोली येथे प्रेक्षक गॅलरी उभारणीच्या कामाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील रामलीला मैदानावर वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने तीनदिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. चार) संयोजन समितीच्या वतीने मैदान साफसफाई, लाल माती टाकणे, प्रेक्षक गॅलरी आदी कामाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने येथील एका रामलीला मैदानावर दहा डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डीचा महासंग्राम हिंगोलीकराना पाहावयास मिळणार आहे. एक डिसेंबरला मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर शनिवारी रन फॉर कबड्डीचा कार्यक्रम पार पडला. आता क्रीडाप्रेमींना राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, संयोजन समितीचे समन्वयक कल्याण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान समितीचे प्रमुख विशाल शिंदे, सत्यप्रकाश नांदापूरकर, विकास जाधव, मधुकर सुतार, दिगंबर पारिसकर, संजू महाराज सरदार यांच्याकडून कबड्डी मैदान तयार करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

याचप्रमाणे बारा थर असलेली गॅलरी उभारण्याचे काम, लाल माती आणून ती साफ करण्याचे कामही सुरू आहे. त्यानंतर संपूर्ण मैदानाची साफसफाई करून, पार्किंग व्यवस्था, स्टेज तयार करणे आदी कामे सुरू आहेत. या स्पर्धेत ग्रामीण भागातील दहा तर शहरी भागातील दोन असे एकूण बारा संघ तर राज्यातून पंधरा संघ सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT