गुन्हे संदर्भात बातमी 
मराठवाडा

हिंगोली : चोरलेला दारुसाठा महावितरणच्या जुन्या निवासस्थानातून जप्त

शहरातील जुना मोंढा भागातुन २२ देशीदारुचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी दुकानातुन चोरुन नेले होते. शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावुन चोरटे निष्पन्न केल्यानंतर चोरुन नेलेला दारुसाठा महावितरणच्या जुन्या निवासस्थानात आढळला.

राजेश दार्वेकर

हिंगोली : शहरातील जुना मोंढा भागातुन २२ देशीदारुचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी दुकानातुन चोरुन नेले होते. शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावुन चोरटे निष्पन्न केल्यानंतर चोरुन नेलेला दारुसाठा महावितरणच्या जुन्या निवासस्थानात आढळला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली येथील जुना मोंढा भागातील सुर्यकांत गव्हाणे यांच्या दारु दुकानाचे शटर चोरट्यांनी तोडुन दुकानात प्रवेश करुन २२ देशीदारुचे बॉक्स व सीसीटीव्हीचे डिव्हीआर बॉक्स असा ५६ हजार ८०० रुपयांचा माल ता. १६ एप्रील रोजी चोरुन नेला होता. या प्रकरणी ता. १७ एप्रिलला हिंगोली शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, हवालदार शेख शकील, सुधीर ढेंबरे, शेख मुजीब, दिलीप बांगर, गजानन होळकर यांच्या पथकाने गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही फोडला होता. परंतु एका उंच ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे फुटेज कैद्य झाले होते. त्या वर्णनावरुन चोरटे निष्पन्न करण्यात आले.

हेही वाचा - प्राध्यापक भरतीबाबत शासनाची उदासीनताच दिसत आहे

तीन महिलांना अटक

हिंगोली येथील पारधीवाडा भागातुन तीन महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच गुन्ह्यामध्ये रवि चव्हाण हा सुध्दा असल्याची माहिती महिलांनी पोलिसांना दिली. चव्हाण हा सध्या फरार असून तिन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोरुन नेलेल्या दारुच्या बॉक्सची माहिती विचारली असता महावितरण कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जुन्या निवासस्थानामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती महिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी तेथे जावुन पाहणी केली. यावेळी एका जुन्या निवासस्थानात दरवाज्याला कुलूप लावलेल्या खोलीतुन २२ देशी दारुचे बॉक्स हस्तगत करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT