हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय 
मराठवाडा

हिंगोली : पानकनेरगाव येथे लवकरच उपबाजारपेठ सुरु होणार

विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पानकनेरगाव व साखरा येथे असून हिंगोली बाजार समितीचे विभाजन होऊन सेनगाव बाजार समिती अस्तित्वात आली. त्यावेळेस पानकनेरगाव उपबाजार बाजार समिती सेनगावकडे वर्ग करण्यात आली होती आता लवकरच सुरु होणार आहे.

पानकनेरगाव येथे बाजार समितीची एक हेक्टरपेक्षा जास्तीची जागा राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. सध्याच्या जमिनीची मोजणी करुन मोजणी कार्यालयाकडून ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असून याबाबत लवकरच कार्यालयाकडून प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पानकनेरगाव हे राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने या गावावरुन शेतकऱ्यांच्या शेतमालाची जास्त आवक होते. तसेच पानकनेरगाव येथे अनेक वर्षापासून हळद मार्केट म्हणून प्रसिद्ध असल्याने हळद मार्केट सुरु व्हावे अशी गावकऱ्याकडून वारंवार विनंती केली जात होती. याबाबत बाजार समितीने अनेक वेळेस बैठकांचे आयोजन करुन तसे प्रयत्नही सुरु केले होते.

हेही वाचा - शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास साडेआठ लाख रुपयांची बॅग दोन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून जबरीने चोरली म्हणून पोलिस ठाण्यात आलेल्या व्यक्तीची सत्यता पडताळणी केली असता कांही मिनिटातच हा प्रकार उघड झाला.

त्याला आता यश येताना दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय देशमुख यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून याबाबत सर्वाना याचे महत्व समजावून सांगितले. यावेळी सर्व व्यापारी उपस्थित होते. बाजार समितीचे नूतन प्रशासक जितेंद्र भालेराव यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन उद्यापासूनच बीट सुरु करतो. अशी ग्वाही दिली. बाजार समितीस व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे त्यांनी सुचविले आहे. हळद लिला्व, हाराशी मंगळवार, गुरुवार, शनिवारला होती. व यावेळेस बाजार समितीचे सर्व कर्मचारी येतील आणि लिलाव करुन देतीलअसेही त्यांनी सुचवले.

बाजार समितीने पानकनेरगावच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला आहे याबद्दल सरपंच कुलदीप देशमुख यांनी बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांचे आभार मानले. यावेळी बाजार समिती माजी सचिव गणेश देशमुख व गावातील ज्येष्ठ मंडळी व्यापारी सोशलडिस्टन्स यांचे पालन करून उपस्थित होते. उप बाजार पानकनेरगाव येथे सुरू झाल्याने आम्हा शेतकऱ्यांनाही सुख लाभणार आहे. असे शेतकरी वर्गातून बोलले जाऊ लागले होते. बाजार समितीचे प्रशासक म्हणून नवीन नियुक्ती झालेले जितेंद्र भालेराव यांनी कामाचा धडाका सुरु केलेला आहे. अवैध खरेदी करणाऱ्यावरही कारवाईचे शस्त्र त्यांनी उचललेले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणा..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT