file photo 
मराठवाडा

हिंगोली : बाल विवाह रोखण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील  इंजनगाव व हिंगोली तालुक्यातील पेडगाववाडी, लोहगाव येथील अल्पवयीन मुलीचे बाल विवाह लावून दिले जात असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला व पोलीस प्रशासनास मिळाली असता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार चाईल्ड लाईन व पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे सलग तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

तुळशी विवाहानंतर लग्न सराईला वेग आला असून जिल्ह्यामध्ये एकाच आठवड्यात तीन बाल विवाहाचे नियोजन झाले होते. सदर बाल विवाह होत असल्याची चाहुल चाईल्ड लाईन मार्फत लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा कक्षातील अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण तर पोलीस प्रशासन व चाईल्ड लाईन यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील  इंजनगाव, पेडगाववाडी व लोहगाव गावातील ग्रामबाल संरक्षण समितीच्या मदतीने बालविवाह रोखण्यात आले.

बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यात एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बाल विवाहाच्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन करण्यात आले. ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष लेखी जबाब लिहुन घेवून बाल विवाह रोखण्यात आले, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती कोरडे यांनी दिली आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT