file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली : कळमनुरीत उमेदवार घेऊन अर्ज करण्यासाठी आलेल्या कारला अचानक आग

संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली ) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवार व कार्यकर्त्यांना घेऊन आलेल्या क्रुझर गाडीला अचानक आग लागल्यामुळे बुधवार (ता. ३०) ला पंचायत समिती कार्यालयासमोर मोठी धावपळ उडाली. पोलिस व नागरिकांनी वेळीच दक्षता दाखवत गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालय व परिसरात मोठ्याप्रमाणावर संभाव्य उमेदवार व त्यांच्या पाठीराखे कार्यकर्त्यांनी वाहने घेऊन बुधवारी तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास (एमएच २९- एडी ०४२०)  या क्रुझर जीपमधून उमेदवार व त्यांचे पाठीराखे कार्यकर्ते कळमनुरी शहरात दाखल झाले. आपले वाहन लावण्याकरता त्यांनी जागेचा शोध चालविला असतानाच पंचायत समिती कार्यालयासमोर अचानकपणे जीपच्या बोनेटमधून धुराचा मोठा लोळ उठला. 

गाडीला आग लागण्याचे समजताच गाडी चालकाने गाडी थांबवली. गाडीमधील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तातडीने गाडीबाहेर उड्या घेतल्या.  हा प्रकार घडल्यानंतर गर्दी नियंत्रणासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे,  कर्मचारी श्री. राठोड,  श्री जगताप,  गृहरक्षक दलाचे जवान अजय वर्मा, केशव संगेकर यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तातडीने आग लागलेल्या क्रुझर गाडीच्या बोनेटवर पाण्याचा व मातीचा वापर करुन आग आटोक्यात आणली.  

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT