file photo 
मराठवाडा

हिंगोली : टेंभुर्णीचे टमरेल बहाद्दर गुड मॉर्निंग पथकाच्या तावडीत; उघड्यावर जाणाऱ्यांची गावभर पळापळ

पंजाब नवघरे

वसमत (जिल्हा हिंगोली)  : वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे सोमवारी (ता. १५) पहाटे साडेपाच वाजताच गुड मॉर्निंग पथक गावात धडकले. हातात टमरेल घेऊन जाणाऱ्यांची चांगलीच फजिती झाली. यावेळी पथकाने समज दिली मात्र दुसर्‍या वेळी दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला.

वसमत तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे यांनी गुड मॉर्निंग पथके स्थापन केली. सोमवारी या पथकातील कर्मचारी बी. आर. गोरे, प्रथमेश घोंगडे, बी. सी. खंदारे, आर. पी. खिराडे, डी. व्ही. अहिरे, ग्रामसेवक ए. पी. गीते, सरपंच शेख हसन, श्री सवंडकर, राजू सवंडकर, माजी सरपंच श्री. आळणे यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी टेंभुर्णी गावाला पहाटे साडेपाच वाजताच भेट दिली.

आजारापेक्षा प्रतिबंध बरा याप्रमाणे गावकऱ्यांनी शौचालयाचा वापर करावा

यावेळी गावातील काही व्यक्ती हातात टमरेल घेऊन प्रात: र्विधी उरकण्यासाठी जात असल्याचे आढळून आले. या पथकाने त्या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत गांधीगिरी केली. तसेच शौचायलयाचा वापराचे महत्त्व पटवून दिले. उघड्यावर होणाऱ्या घाणीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच विविध आजारांची माहितीही त्यांना दिली. आजारापेक्षा प्रतिबंध बरा याप्रमाणे गावकऱ्यांनी शौचालयाचा वापर करावा असे आवाहन या वेळी करण्यात आले. गावकऱ्यांनाही यापुढे शौचालयाचा वापर करण्याची समज देण्यात आली. तर गावकऱ्यांनी शौचालयाचा वापर केला जाईल असे आश्वासन पथकाला दिले. दरम्यान गुड मॉर्निंग पथकाच्या अचानक भेटीने हातात टमरेल घेऊन जाणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.

यापुढे दंडात्मक कारवाई करणार  

वसमत तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातून शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही काही ठिकाणी त्याचा वापर केला जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच आता गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यापुढे स्वच्छतागृहाचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गावकऱ्यांनी स्वत: चे व गावाचे आरोग्य लक्षात घेऊन शौचालयाचा वापर करावा.
- विठ्ठल सुरुशे, गटविकास अधिकारी , वसमत.

संपादन-  प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

SCROLL FOR NEXT