file photo 
मराठवाडा

हिंगोली : वाहन निरिक्षकास धमकी; कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी  काळ्या फिती लाऊन केला निषेध

राजेश दारव्हेकर

हिंगोली : परभणी येथील वाहन निरीक्षक अभिजीत तरकसे हे शासकीय कर्तव्य बजावत असताना मोटार स्कूल चालकाने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी ता.आठ काळ्या फिती लाऊन निषेध केला आहे.

परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक अभिजीत तरकसे हे शासकीय कर्तव्य बजावत असतांना  पाच फेब्रुवारी रोजी त्यांना  परभणी येथील एका मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकाने शासकीय कामात  अडथळा निर्माण करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी परभणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

कर्मचाऱ्याला काम करीत असताना अडथळा निर्माण करून धमकावल्याने  या घटनेचा निषेध व्यक्त करत सोमवारी  हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काळ्या फिती लावून या घटनेचा जाहिर निषेध केला आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी, मोटर वाहन निरीक्षक, व्ही. जी. कळंबकर, मोटर वाहन निरीक्षक जगदिश माने, मोटर वाहन निरीक्षक एस.एम.कंदकृर्तीकर, मोटर वाहन निरीक्षक शैलेश कोपुल्ला, मोटर वाहन निरीक्षक नलीनी काळपांडे, डी. एम. कोमलवार, भगवान लांडगे, जी. के. बंदुके, मुदतसर, आर..वी. चौधरी, शेख, बी. जी. पवार संतोष वाटसर आदी कर्मचारी यात  सहभागी झाले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT