file photo 
मराठवाडा

हिंगोली: कंदकुजी रोगामुळे हळद उत्पादक शेतकरी हैराण - डाॅ. अंकुश चोरमुलेंचा उपाययोजनेचा सल्ला

संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : तालुक्यात संततधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साठुन हळद पिकावर कंदकुंजी रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी हळद उत्पादक शेतकर्‍यांनी जैविक व रासायनिक नियंत्रण प्रतिबंधक उपाय योजना करण्याचा सल्ला येथील गोदा फार्म चे तांत्रिक सल्लागार डॉ अंकुश चोरमुले यांनी दिला आहे.

मागील आठवड्यात शहर व परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली होती या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मूग व उडीद पिकाच्या शेंगा ला कोंब फुटले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून हे पीक गेल्यात जमा आहे पावसामुळे हळद पिकाला ही मोठा फटका बसला आहे. संततधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साठून हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे हळदीच्या शेतात साठलेल्या पाण्यामुळे  पिकावर कंदकुंजी रोगाचा मोठा प्रादुर्भाव पसरला आहे.

शेतामध्ये साठलेले पाणी बाहेर काढावे

या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पिकाच्या नवीन फुटव्यांची पाणी पिवळसर तपकिरी रंगाची होऊन खोडाचा रंग तपकिरी काळवट होऊन निर्जीव होतो सध्या हळद पिकावर या रोगाचा मोठा प्रादुर्भाव पसरला आहे या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी तज्ञ डॉ.अंकुश चोरमुले यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सर्वप्रथम शेतामध्ये साठलेले पाणी बाहेर काढावे त्यानंतर जैविक नियंत्रण प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा दोन ते अडीच किलो प्रति एकरी २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून द्यावे.

रोगाची तीव्रता असल्यास मेटॅलॅक्सिकल आठ टक्के अधिक मॅन्कोझेब ६४ टक्के

रासायनिक नियंत्रणामध्ये कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड चार ते पाच ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी रोगाची तीव्रता असल्यास मेटॅलॅक्सिकल आठ टक्के अधिक मॅन्कोझेब ६४ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) चार ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

कंदकुंजी रोगाचा प्रादुर्भाव नाहीसा होण्यास मदत मिळणार

आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा, आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडासा ताण द्यावा, त्यानंतरची कंदकुंजी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास परत एकदा वरील दर्शविलेल्या औषधाची आळवणी करण्यात यावी यामुळे हळद पिकावर जाणवत असलेल्या कंदकुंजी रोगाचा प्रादुर्भाव नाहीसा होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती डॉ. अंकुश चोरमुले यांनी दिली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT