file photo 
मराठवाडा

हिंगोली : पोतरा येथेही अज्ञात रोगाने २०० कोंबड्या दगावल्या

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापुरनंतर याच तालुक्यातील पोतरा येथे शनिवारी ता.२३ अज्ञात रोगाने दोनशे कोंबड्या दगावल्याने खळबळ उडाली आहे.

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथे काही दिवसापुर्वी दगावलेल्या कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या परिसरातील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंबड्या पशुसंवर्धन विभागाने नष्ट केल्या आहेत. त्यानंतर येथून जवळच असलेल्या कृष्णापुर येथे देखील कोंबड्या दगावल्या आहेत. पिंपरी येथे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेट देऊन येथील १८७ कोंबड्या नष्ट केल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान आता हे लोन कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावापर्यंत पोहचले आहे. शनिवारी येथे दोनशे कोंबड्या अचानक दगावल्या आहेत. यात मारोती खराटे ४०, रामकिशन भुसनर ३०, गजानन मुलगीर ५५, चंद्रभान झुगंरे, आठ, शंकर रणवीर ३०, लक्ष्मण पवार ३०, सखाराम गायकवाड १३ अशा एकुण दोनशे कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्हानंतर हिंगोली जिल्ह्यात कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे यात कळमनुरी तालुक्यातील तीन गावात आतापर्यंत कोंबड्या दगावल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

Why Eyes Twitch: डोळा सारखा फडकतोय ? समजू नका सामान्य; शरीरात असू शकते या घटकाची कमतरता!

मराठी अभिनेत्रीसोबत केलेलं लग्न पण घटस्फोटाने पूर्ण खचले, यतीन कार्येकर यांनी पहिल्यांदाच बोलले; मी कामात होतो तेव्हा ती...

Ambad car theft case : अंबड तालुक्यातील कार चोरीचा अवघ्या सहा तासांत उलगडा; दोन चोरटे जेरबंद, शस्त्रांसह स्विफ्ट डिझायर कार जप्त

SCROLL FOR NEXT