file photo 
मराठवाडा

हिंगोली : पिंपळदरीतील शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावकरी सरसावले

राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी गावकऱ्यांची बुधवार ( ता. १० ) बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये गावातील ग्रामस्थांच्या वतीने शाळेचा कायापालट करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यात आली . यामध्ये एकाच दिवसात १ लाख १० हजार रुपयाची वर्गणी शिक्षणप्रेमींच्या वतीने जमा झाली. 

शाळेत नसणाऱ्या सर्वच भौतिक गर्जा पूर्ण करण्यासाठी व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी ग्रामस्थ व शिक्षण प्रेमींच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे शाळेच्या सर्वांगीन विकासासाठी गावातील ग्रामस्थांची बैठक पिंपळदरीच्या सरपंच रत्नमाला भुरके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गावातील शिक्षणप्रेमी मंडळी कोरोनाचे नियम पाळत  हजर होती.

यावेळी लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट करण्याबाबत चर्चा झाली त्याला प्रतीसाद देत पिंपळदरीचे ग्रामस्थ अभिनंदन  धोंगडे,  संजय मेथेकर, संजय पाटील, भगवान रिठ्ठे  ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व सदस्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,  साहेबराव  भगत,  शेख बद्रोदीन,  ग्यानदेव  रीठ्ठे, शिलाबाई  बलखंडे, रेखाबाई दशरथ भगत, शंकुतला दोडल ग्रामसेवक सुनिल मुळे आदींनी एक लाख १० हजाराची वर्गणी जमा केली. तर शिवाजी रीठे ५० रोपे देणार , बापुराव  घोंगडे  यांनी शाळेचा गेट दुरुस्त करुन बसविण्यासाठी लागणारा सर्व खर्च उचलला आहे.  आता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकातुन समाधान मानले जात आहे.

संपादन- प्रल्हाद  कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT