Hingoli Heavy rains Kayadhu Asana river flood
Hingoli Heavy rains Kayadhu Asana river flood 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी; कयाधु, आसना नदीला पुर

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील चोवीस तासात शनिवारी ता.नऊ सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर कयाधु, आसना, जलेश्वर या नद्यांना पुर आला आहे. या पावसाने पिकांचे नुकसान देखील झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कुरुंदा मंडळात १७९.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागच्या चार दिवसापासून सलग पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुका ४७.९० मिलीमीटर, कळमनुरी ९६.९० वसमत १०६.२, औंढा ४५.८० तर सेनगाव तालुक्यात २६.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

म़ंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली मंडळात ५८.३ नर्सी नामदेव ६३, सिरसम २५.४, बासंबा २७.८, डिग्रस ५५, माळहिवरा ४०.५, खांबाळा ६५.३ तर हिंगोली तालुका एकुण ४७.४ मिलीमीटर पाऊस झाला. कळमनुरी मंडळात ४१.८, मिलीमीटर वाकोडी ६५, नांदापुर ३९, बाळापुर १२७.५,डोंगरकडा १५७.८, वारंगा १५० एकुण ९६.९ मिलीमीटर पाऊस झाला.

वसमत मंडळात वसमत ८८.३, आंबा १३० ५, हयातनगर ६९.३, गिरगाव १६७.८, हट्टा ५२.३, टेभुर्णी ५५८, कुरुंदा १७९ ३, मिलीमीटर पाऊस झाला तालुक्यात १०६.२ मिलीमीटर पाऊस झाला. औंढा म़डळात ४८.५, येहळेगाव ३३, साळणा ४८.५, जवळा ५३.५ एकुण

४५.८ मिलीमीटर पाऊस झाला. सेनगाव मंडळात १७.८, गोरेगाव १९.८, आजेगाव ३३.५,, गोरेगाव ३८ ५, आजेगाव २४.३, साखरा १३.८, पानकनेरगाव १५.५, हत्ता ३३ ५ तर एकुण ६६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT