hingoli hingoli
मराठवाडा

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे हिंगोलीत तरूण विवाहितेचा गेला जीव

विजेच्या खांबावरून आलेल्या सर्विस वायर मधून वीजप्रवाह झाल्याने पत्रे उडू नये म्हणून देण्यात आलेल्या पत्राच्या तणाव्यात वीजप्रवाह आला.

प्रभाकर बारसे

गिरगाव (हिंगोली): वसमत तालुक्यातील गिरगाव येथे विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गुरुवार (ता. २९) येथील तरुण विवाहीत महिलेचा विजेचा शॉक लागून मुत्यू झाल्याची घटना सुमारास घडली आहे. याबाबत इंजिनिअर व लाईनमन यांच्या विरुद्ध शुक्रवारी (ता. २९) कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत महिलेला एक वर्षाची चिमुकली मुलगी आहे. गिरगाव येथील पुंडलीकराव कल्याणकर यांची मुलगी सुनिता हीचा विवाह धानोरा (ता. उमरी जि नांदेड) येथील गौराजी सलगरे यांच्याशी झाला होता. काही दिवसांपासून आपले माहेर असलेल्या गिरगांव येथे कुडलीकराव कल्याणकर ह्या आपल्या वडीलांकडे राहत होती.

गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरावरील पत्रे उडू नये म्हणुन पत्रावरुन तारांचा ताण देण्यात आला होता. या तारांमध्ये अचानक विजप्रवाह सुरू झाला घरातून बाहेर येताना सुनिता हिचा हात त्या विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने सुनिता सलगरे हिचा जागीच मुत्यू झाला. तनाव्याच्या तारामध्ये विद्युत प्रवाह कसा काय झाला यांची घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पाहणी केली असता यामध्ये एक धक्कादायक व गंभीर बाब समोर आली. विज वितरण कंपनीकडून विजबिले न भरणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पण ज्याची विज कनेक्शन तोडणी केली ती विजतोडणी थेट विजेच्या खांबावरून करण्याऐवजी मिटरपासून केली. त्यामुळे खांबावरून येणारा विद्युत पुरवठा सुरूच राहिला. सदरील घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा हा प्रकार समोर आला.

कुरूंदा पोलिसांकडे तपास
विजेच्या खांबावरून आलेल्या सर्विस वायर मधून वीजप्रवाह झाल्याने पत्रे उडू नये म्हणून देण्यात आलेल्या पत्राच्या तणाव्यात वीजप्रवाह आला. त्या तणाव्याच्या तारांना स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेला जीव गमवावा लागला दरम्यान, पुंडलिक कल्याणकर यांनी शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून गिरगाव सबस्टेशनचे इंजिनिअर जीवन राठोड, लाईनमन अनिल अवकाळे यांच्याविरुद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कुरूंदा पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Latest Marathi News Live Update : मोहोळ पोलीस ठाण्याच्यावतीने रन फॉर युनिटी उपक्रम

SCROLL FOR NEXT